bank withdrawal: बँकेतून पैसे काढण्यासाठी थेट मृत बहिणीच्या हाडांचा सांगाडा घेऊन आला... बँक कर्मचाऱ्यांची पाचावर धारण

Odisha man brings skeleton to bank
Odisha man brings skeleton to bankpudhari
Published on
Updated on

Odisha man brings skeleton to bank: ओडिसामधील केओंजहार जिल्ह्यातील एका आदिवासी व्यक्तीने सोमवारी आपल्या मृत बहिणीच्या हाडांचा सांगाडा घेऊन बँकेत पोहचला. त्याला तिच्या नावावरचे पैसे काढायचे होते अशी माहिती पोलिसांनी सांगितलं. ही घटना ओडिसामधील केओंजहार जिल्ह्यातील पटना ब्लॉक इथल्या ओडिसा ग्रामीण बँक मालीपोसी ब्रँचमध्ये घडली.

Odisha man brings skeleton to bank
जालना मर्चेंट बँकेत अनियमिततेची चर्चा; ग्राहकांमध्ये खळबळ

जीतू एकमेव कायदेशीर वारसदार

मृत बहिणीच्या हाडांचा सांगाडा घेऊन येणाऱ्या व्यक्तीचे नाव जितू मुंडा असून त्याचे वय ५० वर्षे आहे. तो दिआनाली गावचा रहिवासी आहे. त्याला त्याच्या मोठ्या बहिणीच्या कालरा मुंडा यांच्या अकाऊंटमधून २० हजार रूपये काढायचे होते. दोन महिन्यापूर्वी कालरा यांचे आजारपणामुळे निधन झाले आहे. तिने हे पैसे जनावर विकून मिळवले होते.

कालरा यांचा जितू मुंडाशिवाय दुसरा कोणी कायदेशीर वारसदार नाहीये. त्यामुळं मुंडा हे काही दिवसांपूर्वी बँकेत पैसे काढण्यासाठी आले होते. मात्र बँक अधिकाऱ्यांनी त्यांना मृत्यूचा दाखला आणि इतर गरजेची कागदपत्रे आणण्यास सांगितलं.

Odisha man brings skeleton to bank
Jalna bank scams : जिल्हा बनला बँक घोटाळ्याचे केंद्र, अर्थचक्र कोलमडले

कागदपत्रे आणण्यात अपयश

मुंडा यांना याबाबतची सर्व कागदपत्रे देणे शक्य झालं नाही. त्यानंतर त्यांनी आपल्या बहिणीला ज्या ठिकाणी पुरलं होतं तेथून मिळेल तो हाडाचा सांगाडा घेऊन बँकेत पोहचले.

अशिक्षित जीतू मुंडा यांनी पत्रकारांना सांगितलं की, 'मी या बँकेच्या अनेक चक्रा मारल्या आहेत. तेथील लोकं मला बँकेचे अकाऊंट ज्यांच्या नावावर आहे त्यांना घेऊन या मगच पैसे काढून देणार असं सांगितलं. मी त्यांना सांगितलं की तिचा मृत्यू झाला आहे. तरी देखील ते काही ऐकायला तयार नाहीत. ते माझ्या बहिणीला बँकेत घेऊन येणासच सांगत होते. त्यामुळं मी नाईलाजास्तव तिची कबर पुन्हा खोदली अन् तिचा हाडांचा सांगाडा पुरावा म्हणून घेऊन आलो आहे.'

Odisha man brings skeleton to bank
Fraud Case : बँक कर्मचारी असल्याचे सांगून भाजीपाला विकणाऱ्या बहिणींची ४८ लाखांनी फसवणूक

पोलीस आले अन् आश्वासन दिलं

दरम्यान, पटना पोलीस स्टेशन इन्स्पेक्टर किरण प्रसाद साहू हे माहिती मिळताच बँकेत पोहचले. त्यांनी सांगितलं की, 'जीतू हे अशिक्षित आदिवासी व्यक्ती आहेत. त्यांना कायदेशीर वारसदार किंवा नॉमिनी काय असतात हे माहिती नाही. बँक अधिकाऱ्यांना त्यांना हे पटवून देणे जमले नाही. त्यांना मृत व्यक्तीच्या बँक अकाऊंटमधून पैसे कसे काढायचे याची प्रक्रिया कशी असते हे सांगता आले नाही.'

या घटनेनंतर पोलिसांनी जीतू मुंडा यांना त्यांच्या मृत बहिणीच्या अकाऊंटमधून पैसे काढून देण्याची सोय करून देतो असं आश्वासन दिलं आहे. यानंतर कबरीतून बाहेर काढण्यात आलेला हाडांचा सांगाडा पुन्हा पुरण्यात आला. यावेळी पोलीस देखील उपस्थित होते.

Odisha man brings skeleton to bank
Crime News |अर्धवट जळालेला मृतदेह, हातावरील टॅटू अन् QR कोड...पतीच्या निर्घृण हत्‍येचे गूढ अखेर उलगडले!

बीडीओची सारवासारव

दरम्यान, स्थानिक गट विकास अधिकारी मानस दंडपट यांनी सांगितलं की यापूर्वी आमच्याकडे कोणीही कालरा मुंडा यांचा कायदेशीर वारस म्हणून आलं नव्हतं. आजच मला याबाबतची माहिती मिळाली आहे. आम्ही या प्रकरणी काय करता येईल हे पाहू.'

दरम्यान, बँकेतील सूत्रांनी सांगितलं की कालरा मुंडा यांच्या बँक अकाऊंटला असलेले नॉमिनी यांचे देखील निधन झाले आहे. त्यामुळं कालरा यांच्या बँक खात्यातील पैशाचे जीतू मुंडा हे एकमेव दावेदार आहेत. आता बँक अधिकाऱ्यांनी जीतू यांना लवकरात लवकर पैसे मिळवून देण्याची प्रक्रिया सुरू करा असे सांगितले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news