Delhi HC: 1965 पूर्वीच्या जुन्या हिंदी गाण्यांवर कोणाचाही मालकी हक्क नाही; दिल्ली उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

Pre 1965 Bollywood Songs Copyright: दिल्ली उच्च न्यायालयाने सांगितलं की, 1965 पूर्वी प्रकाशित झालेल्या हिंदी चित्रपट गाण्यांसाठी परवाना आवश्यक नाही. कॉपीराइट कायद्यानुसार साउंड रेकॉर्डिंगचा हक्क 60 वर्षांनंतर संपतो.
Pre 1965 Bollywood Songs Copyright
Pre 1965 Bollywood Songs CopyrightPudhari
Published on
Updated on

Pre 1965 Bollywood Songs Copyright: लता मंगेशकर, मोहम्मद रफी, किशोर कुमार, आशा भोसले यांसारख्या दिग्गज गायकांनी गायलेली हिंदी चित्रपटसृष्टीची सुवर्णकाळातील (Golden Age) गाणी आजही हॉटेल्स, कार्यक्रम, टीव्ही आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात ऐकली जातात. ही गाणी प्रामुख्याने सारेगामा इंडिया लिमिटेडशी संबंधित असली, तरी त्यांचे कॉपीराइट कायमस्वरूपी नसतात, हा महत्त्वाचा मुद्दा आता समोर आला आहे.

कॉपीराइट किती काळ असतो?

भारतातील कॉपीराइट कायदा 1957 मधील कलम 27 नुसार, एखाद्या साउंड रेकॉर्डिंगचा कॉपीराइट हा त्याच्या पहिल्या प्रकाशनानंतरच्या वर्षापासून 60 वर्षे असतो. ही मुदत संपल्यानंतर ते गाणे Public Domain मध्ये जाते. म्हणजेच, अशा गाण्यांचा वापर करण्यासाठी कोणताही परवाना (लायसन्स) घेण्याची गरज नाही.

उदाहरणार्थ, 1965 साली प्रसिद्ध झालेल्या गाण्यांचा कॉपीराइट 2025 च्या अखेरीस संपतो. त्यामुळे 1950 आणि 1960 च्या सुरुवातीला आलेली अनेक लोकप्रिय हिंदी गाणी लवकरच सार्वजनिक वापरासाठी खुली होत आहेत.

Pre 1965 Bollywood Songs Copyright
NSE Holidays 2025: आज ख्रिसमसमुळे शेअर बाजार बंद; शुक्रवारपासून व्यवहार सुरू, 2026 च्या सुट्ट्यांची यादी जाहीर

दिल्ली उच्च न्यायालयात नेमकं काय घडलं?

ऑक्टोबर 2025 मध्ये Bignet Solutions LLP या संस्थेला एका खासगी कार्यक्रमात काही जुनी हिंदी गाणी वाजवण्यासाठी Novex Communications Pvt Ltd कडून परवाना घेण्यास सांगण्यात आलं. याविरोधात Bignet ने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली.

10 ऑक्टोबर 2025 रोजी न्यायालयाने स्पष्ट केलं की, Novex ज्या गाण्यांचे मालक नाही किंवा जी गाणी आधीच Public Domain मध्ये आहेत, त्यांच्यावर Novex कोणताही हक्क सांगत नाही. यानंतर Bignet ने फक्त 1965 पूर्वीची गाणी वाजवण्याची हमी दिली आणि कार्यक्रम कोणत्याही अडथळ्याशिवाय पार पडला.

21 नोव्हेंबर 2025 रोजीच्या सुनावणीत, Novex ने पुन्हा सांगितलं की, 1965 पूर्वी प्रकाशित झालेल्या साउंड रेकॉर्डिंगवर ते कॉपीराइटचा दावा करत नाहीत. कार्यक्रम शांततेत पार पडल्याने, न्यायालयाने ही केस निकाली काढली.

Pre 1965 Bollywood Songs Copyright
Rohit Sharma Video Viral: ‘रोहित भाई, वडा पाव खाणार का?’ चाहत्याच्या प्रश्नावर रोहित शर्माची रिअ‍ॅक्शन होतेय व्हायरल

या निर्णयामुळे एक महत्त्वाचा मुद्दा समोर आला आहे. दरवर्षी अनेक जुनी गाणी कॉपीराइटमुक्त होत आहेत.

याचा फायदा

▪️ कार्यक्रम आयोजक
▪️ हॉटेल्स
▪️ इव्हेंट मॅनेजर्स
▪️ छोटे व्यवसाय
▪️ सांस्कृतिक उपक्रम

यांना होऊ शकतो, कारण Public Domain मधील गाण्यांसाठी कोणतेही लायसन्स आवश्यक नाही.

तज्ज्ञांच्या मते, जुन्या गाण्यांची मूळ तारीख आणि सार्वजनिक स्वरूपात उपलब्ध असणे गरजेचे आहे. त्यामुळे कोणते गाणे अजूनही कॉपीराइटमध्ये आहे आणि कोणते मुक्त झाले आहे, हे सर्वांना सहज समजू शकेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news