Rohit Sharma Video Viral: ‘रोहित भाई, वडा पाव खाणार का?’ चाहत्याच्या प्रश्नावर रोहित शर्माची रिअ‍ॅक्शन होतेय व्हायरल

Rohit Sharma Vada Pav Viral: विजय हजारे ट्रॉफी सामन्यात बाउंड्रीवर फील्डिंग करताना रोहित शर्माला चाहत्याने “वडा पाव खाणार का?” असा प्रश्न विचारला. रोहितने हसत हात हलवून दिलेली रिअ‍ॅक्शन सोशल मीडियावर व्हायरल झाली.
Rohit Sharma Vada Pav Viral Vijay Hazare
Rohit Sharma Vada Pav Viral Vijay HazarePudhari
Published on
Updated on

Rohit Sharma Vada Pav Viral Vijay Hazare: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मा केवळ आपल्या फलंदाजीसाठीच नाही, तर त्याच्या मोकळ्या आणि दिलखुलास स्वभावासाठीही चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहे. सध्या त्याची मजेशीर रिअ‍ॅक्शन सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

बुधवारी रोहित शर्मा विजय हजारे ट्रॉफीच्या सामन्यात मुंबईकडून खेळताना दिसला. जयपूरमधील सवाई मानसिंह स्टेडियमवर मुंबई आणि सिक्किम यांच्यात सामना सुरू होता. यावेळी रोहित बाउंड्री लाईनवर फील्डिंग करत असताना प्रेक्षकांमधून एका चाहत्याने प्रश्न विचारला, “रोहित भाई, वडा पाव खाणार का?”

Rohit Sharma Vada Pav Viral Vijay Hazare
Who Is Arif Habib: कोण आहेत आरिफ हबीब? ज्यांनी पाकिस्तानची सरकारी विमान कंपनी खरेदी केली... गुजरातशी आहे थेट कनेक्शन

हा प्रश्न ऐकताच रोहित शर्मा हसला आणि हात हलवून नकार दिला. हा साधा, पण दिलखुलास क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आणि काही मिनिटांतच सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाला. चाहत्यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.

सात वर्षांनंतर विजय हजारे ट्रॉफीत पुनरागमन

या सामन्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे रोहित शर्माने तब्बल सात वर्षांनंतर विजय हजारे ट्रॉफीत पुनरागमन केलं. रोहितला पाहण्यासाठी सुमारे 10 हजार प्रेक्षक स्टेडियममध्ये उपस्थित होते.

Rohit Sharma Vada Pav Viral Vijay Hazare
NSE Holidays 2025: आज ख्रिसमसमुळे शेअर बाजार बंद; शुक्रवारपासून व्यवहार सुरू, 2026 च्या सुट्ट्यांची यादी जाहीर

मैदानावरही रोहितचा जलवा

मैदानावरही रोहित शर्माने चाहत्यांना निराश केलं नाही.

▪️ 61 चेंडूत शतक,
▪️ 94 चेंडूत 155 धावा,
▪️ 18 चौकार आणि 9 षटकार

अशी जबरदस्त खेळी त्याने केली.

रोहितच्या या दमदार खेळीच्या जोरावर मुंबईने 8 गडी राखून आणि 117 चेंडू शिल्लक असतानाच सामना जिंकला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news