Nitin Gadkari E20 Petrol: E20 विरोधातील उद्रेक हे तर 'पेड कॅम्पेन', केंद्राने E100 ला परवानगी देताच गडकरींचे मोठे वक्तव्य

केंद्र सरकारने १९८९ केंद्रीय मोटर कायद्यात बदल केला असून आता फ्लेक्स फ्युअलवर आधारीत म्हणजे जवळपास १०० टक्के इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्यांना परवानगी दिली आहे.
Nitin Gadkari
Nitin Gadkaripudhari
Published on: 
Updated on: 

Nitin Gadkari E20 Petrol: केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी देशात E20 विरूद्ध जो उद्रेक आहे असं दाखवण्यात आलं ते तर 'पेड कॅम्पेन' होतं असं वक्तव्य केलं. नुकतेच केंद्र सरकारने १९८९ केंद्रीय मोटर कायद्यात बदल केला असून आता फ्लेक्स फ्युअलवर आधारीत म्हणजे जवळपास १०० टक्के इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्यांना परवानगी दिली आहे. त्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हे वक्तव्य केलं.

Nitin Gadkari
Nitin Gadkari: 'तुम्ही कितीही कर्तृत्ववान असाल, बायको ठीक नसेल तर…', गडकरींनी सांगितला लग्नानंतरचा धक्कादायक किस्सा, काय म्हणाले?

इंडस्ट्री बॉडी सीआयआय (CII) च्या एका कार्यक्रमात बोलताना गडकरी यांनी तुम्ही जमिनीखालून येणाऱ्या तेलाचा वापर कमी करून तुमचे परकीय चलन वाचवू शकता असे वक्तव्य केलं.

नितीन गडकरी म्हणाले, 'तीन महिन्यापूर्वी E20 विरोधात खूप आवाज ऐकू येत होता. आता हा राग अन् रोष संपला आहे. कारण ते एक पेड कॅम्पेन होतं.'

Nitin Gadkari
Nitin Gadkari Inaugurates | गोवा प्रदूषणापासून मुक्त करा!

गडकरी यांनी गेल्या तीन वर्षात २० कोटीपेक्षा जास्त दुचाकी आणि ३ कोटीपेक्षा जास्त पेट्रोल कार रस्त्यावर धावत आहे. त्यात E19-20 पेट्रोलच वापरलं जात आहे. त्यात कोणतेही इंजीन फेल्युअरची, गाडी अचानक बंद पडल्याची अधिकृत घटना घडलेली नाही.

Nitin Gadkari
Nitin Gadkari : ‘उच्चभ्रू भागापेक्षा गुन्हेगारी, रेड-लाइट भागातून मला अधिक मतदान’

काही विरोधी पक्ष आणि ग्राहकांचे ग्रुप यांनी E20 पेट्रोल बाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं . त्यांनी जुन्या गाड्या ज्या E20 पेट्रोलसाठी डिझाईन केलेल्या नाहीत त्यात बिघाड होत असल्याचा दावा केला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news