PUC Certificate New Rules : PUC नियमांत मोठे बदल; बीएस-१ ते बीएस-६ वाहनांसाठी प्रमाणपत्राची नवी वैधता लागू

PUC Certificate New Rules : नवीन BS-VI वाहनांसाठी प्रमाणपत्राची वैधता अधिक, देशभरात समान नियम लागू
PUC Certificate New Rules
प्रातिनिधिक छायाचित्र. File Photo.
Published on: 
Updated on: 

PUC Certificate New Rules : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने वाहनांच्या 'प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राच्या' (PUC)च्या वैधतेच्या कालावधीत सुधारणा केली आहे. नवीन बदल 'सेंट्रल मोटर व्हेइकल्स (सोळावी सुधारणा) नियम, २०२६' द्वारे लागू करण्यात आले आहेत. यानुसार 'सेंट्रल मोटर व्हेइकल्स नियम, १९८९' मधील नियम ११५(७) मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. या नव्या प्रणालीनुसार, वाहनाचे नोंदणीचा कालावधी आणि त्याच्या उत्सर्जन श्रेणीवरून आता प्रदूषण तपासणी किती कालावधीने करायची, हे ठरणार आहे.

नवीन BS-VI वाहनांसाठी प्रमाणपत्राची वैधता अधिक, देशभरात समान नियम लागू

१३ नोव्हेंबर रोजी अधिसूचित करण्यात आलेल्या नवीन नियमांनुसार, नवीन BS-VI वाहनांसाठी प्रमाणपत्राची वैधता अधिक काळासाठी असेल, तर जुन्या वाहनांना वारंवार उत्सर्जन चाचणी करून घ्यावी लागेल. या सुधारित आराखड्यामुळे देशभरातील जुन्या उत्सर्जन श्रेणींमधील वाहनांसाठी PUC प्रमाणपत्राची वैधता एकसमान झाली आहे. तसेच विविध राज्यांमध्ये जुन्या वाहनांच्या तपासणीबाबत असलेली तफावत दूर करून देशभरात समान नियम लागू करण्यात आले आहेत.केंद्रीय मोटार वाहन नियम, १९८९ मधील नियम ११५(७) मध्ये सुधारणा करून 'केंद्रीय मोटार वाहन (सोळावी सुधारणा) नियम, २०२६' द्वारे हे बदल करण्यात आले आहेत. राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासूनच हे नवे नियम लागू झाले आहेत.

PUC Certificate New Rules
Malaysia Visa Rules : भारतीयांची मलेशियाची 'विना-व्हिसा' सफर संपणार! नवीन वर्षापासून प्रवासाचे नियम बदलणार

पीयूसी प्रमाणपत्राच्या वैधतेत नेमका बदल काय?

यापूर्वी पीयूसी प्रमाणपत्राची वैधता प्रामुख्याने वाहनाच्या 'भारत स्टेज' (BS) श्रेणीवर अवलंबून होती. त्यामुळे बीएस-६ श्रेणीतील नवीन खासगी कार आणि जुने व्यावसायिक वाहन या दोघांनाही केवळ एक वर्षाचीच वैधता मिळत असे. मात्र, आता नव्या रचनेत वाहनाचे वय आणि वापर (खासगी की व्यावसायिक) या दोन बाबींना महत्त्व देण्यात आले आहे.

PUC Certificate New Rules
PM Modi : तुम्ही कर्मचाऱ्यांचे पगार वाढवले का? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कॉर्पोरेट क्षेत्राला थेट सवाल

खासगी बीएस-६ (BS-VI) वाहनांसाठी नवे नियम

  • पूर्वी सर्व खासगी बीएस-६ वाहनांना वयाची अट न ठेवता १२ महिन्यांचे पीयूसी प्रमाणपत्र दिले जात होते. आता यात तीन टप्पे करण्यात आले आहेत:

  • सहा वर्षांपर्यंतची वाहने : पूर्वीच्या १२ महिन्यांऐवजी आता थेट तीन वर्षांसाठी वैधता मिळेल.

  • सहा ते १० वर्षे जुनी वाहने : वैधता पूर्वीप्रमाणेच १२ महिने राहील.

  • १० वर्षांपेक्षा जास्त जुनी वाहने : वैधता १२ महिन्यांवरून कमी करून सहा महिने करण्यात आली आहे.

  • नवीन खासगी बीएस-६ वाहनधारकांना आता वारंवार पीयूसी काढण्याच्या कटकटीतून दिलासा मिळाला आहे, तर १० वर्षांपेक्षा जुन्या वाहनधारकांना दर सहा महिन्यांनी तपासणी करावी लागेल.

PUC Certificate New Rules
IndiGo, एअर इंडिया आणि अकासा एअरचा मोठा निर्णय ; सौदी अरेबियासाठीची सर्व उड्डाणे ३० नोव्हेंबरपर्यंत रद्द

व्यावसायिक बीएस-६ (BS-VI) वाहनांसाठी नियमात कोणते बदल?

व्यावसायिक बीएस-६ वाहनांसाठीही वयानुसार वैधता निश्चित करण्यात आली आहे, मात्र खासगी वाहनांच्या तुलनेत ही सवलत काहीशी कमी आहे

  • सहा वर्षांपर्यंतची वाहने : पूर्वीच्या १२ महिन्यांऐवजी आता दोन वर्षांसाठी वैधता मिळेल.

  • सहा ते १० वर्षे जुनी वाहने : वैधता १२ महिने कायम राहील.

  • १० वर्षांपेक्षा जास्त जुनी वाहने : वैधता कमी करून सहा महिने करण्यात आली आहे.

बीएस-१, २ आणि ३ वाहनांसाठी देशभरात ३ महिन्यांची मर्यादा

जुने उत्सर्जन निकष असलेल्या वाहनांसाठी आता संपूर्ण देशात एकच नियम असेल. यापूर्वी केंद्रीय नियमांनुसार या वाहनांना सहा महिन्यांची वैधता होती, तर दिल्लीसारख्या काही राज्यांत ती तीन महिन्यांची होती. आता नव्या नियमांनुसार, वय किंवा प्रकार कोणताही असो, देशभरातील सर्व बीएस-१, बीएस-२ आणि बीएस-३ वाहनांच्या पीयूसीची वैधता तीन महिनेच असेल. सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना हा नियम समान लागू राहील.

बीएस-४ (BS-IV) वाहनांची वैधता निम्म्यावर

बीएस-४ वाहनांसाठी यापूर्वी केंद्राचा १२ महिन्यांचा नियम होता, जरी दिल्ली-एनसीआर आणि काही राज्यांत सहा महिन्यांची मर्यादा पाळली जात होती. आता सुधारित नियमांनुसार, खासगी असो वा व्यावसायिक, देशभरातील सर्व बीएस-४ वाहनांसाठी पीयूसी प्रमाणपत्राची वैधता सहा महिने निश्चित करण्यात आली आहे.

PUC Certificate New Rules
Supreme Court : ई-चलन न भरल्यास गाडी जप्त होणार! RC आणि PUC रिन्यूअलही होणार बंद; सर्वोच्च न्यायालयाचा कडक इशारा

नूतनीकरण केलेल्या प्रमाणपत्राची वैधता कधीपासून ग्राह्य धरणार?

वाहनधारकाने पीयूसी नूतनीकरण (Renewal) कधी केले, यावरून नव्या प्रमाणपत्राची तारीख ठरेल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. जुन्या प्रमाणपत्राची मुदत संपण्याच्या १० दिवस आधी तपासणी केल्यास, नवे प्रमाणपत्र जुन्या प्रमाणपत्राची मुदत संपल्याच्या तारखेपासून लागू होईल. यामुळे लवकर तपासणी केल्यास वाहनधारकाचे उर्वरित दिवस वाया जाणार नाहीत.मुदत संपल्यानंतर नूतनीकरण केल्यास : जुने प्रमाणपत्र संपल्याच्या दिवशी किंवा त्यानंतर तपासणी केल्यास, ज्या दिवशी तपासणी झाली त्या तारखेपासून नवे प्रमाणपत्र वैध ठरेल.

सध्याच्या जुन्या पीयूसी प्रमाणपत्रांचे काय होणार?

नवे नियम लागू होण्यापूर्वी काढण्यात आलेली पीयूसी प्रमाणपत्रे त्यांच्यावर नमूद केलेल्या मुदतीपर्यंत वैध राहतील. नव्या नियमांनुसार वाहनधारकांनी तात्काळ नवीन पीयूसी काढण्याची गरज नाही. पुढील पीयूसीचे नूतनीकरण कराल, तेव्हाच हे नवे नियम लागू होतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.