Malaysia Visa Rules : भारतीयांची मलेशियाची 'विना-व्हिसा' सफर संपणार! नवीन वर्षापासून प्रवासाचे नियम बदलणार

व्हिसा अनिवार्य नवीन धोरण १ जानेवारी २०२७ पासून होणार लागू
Malaysia Visa Rules
प्रातिनिधिक छायाचित्र.File Photo
Published on: 
Updated on: 

Malaysia Visa Rules : पर्यटनासाठी भारतीय प्रवाशांच्या पसंतीस उतरलेल्या आशियातील सर्वात लोकप्रिय देशांमध्ये मलेशियाचा समावेश होतो. या देशासाठी भारतीय नागरिकांना सध्‍या 'व्हिसा-मुक्त' प्रवेश मिळत होता. मात्र, २०२७ पासून मलेशियाने भारतीयांसाठी असलेली 'व्हिसा-मुक्त' प्रवेश सुविधा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. हे नवीन धोरण १ जानेवारी २०२७ पासून लागू होईल. यामुळे सर्व भारतीय प्रवाशांना मलेशियाला जाण्यापूर्वी व्हिसा घेणे अनिवार्य असेल.

१ जानेवारी २०२७ नंतर भारतीय नागरिकाकडे व्हिसा असणे आवश्यक

१७ नोव्हेंबर रोजी जारी केलेल्या अधिकृत सूचनेनुसार, मलेशियाच्या इमिग्रेशन विभागाने जाहीर केले आहे की, भारतीयांसाठी असलेली 'व्हिसा-मुक्त' प्रवेश सुविधा बंद केली जाईल. या सूचनेनुसार, १ जानेवारी २०२७ रोजी किंवा त्यानंतर मलेशियामध्ये प्रवेश करणाऱ्या प्रत्येक भारतीय नागरिकाकडे येण्यापूर्वी व्हिसा असणे आवश्यक आहे.या बदलाच्या पार्श्वभूमीवर, व्हिसा अर्ज प्रक्रिया बऱ्याच आधी सुरू केली जाईल. भारतीय नागरिक १ डिसेंबर २०२६ पासून 'MyVISA' या ऑनलाइन पोर्टलद्वारे मलेशियाच्या व्हिसासाठी अर्ज करू शकतील.

Malaysia Visa Rules
Malaysia Hindu Temple | मलेशियाच्या गुहेत आहे प्रसिद्ध हिंदू मंदिर!

अपूर्ण अर्जांबाबत कडक धोरण

मलेशियाच्या इमिग्रेशन विभागाने अपूर्ण किंवा प्रलंबित व्हिसा अर्जांबाबतही एक नवीन नियम लागू केला आहे. एखादा अर्ज ७ कामकाजाच्या दिवसांपर्यंत 'नवीन' (new) किंवा 'पेमेंट प्रलंबित' (pending payment) स्थितीत राहिला, तर तो आपोआप रद्द होईल. अशा परिस्थितीत, अर्जदाराला संपूर्ण प्रक्रिया पुन्हा नव्याने सुरू करावी लागेल. हा नियम १ ऑक्टोबर २०२६ पासून लागू झाला असून, १ सप्टेंबर २०२६ पूर्वी सादर केलेल्या अर्जांनाही तो लागू होतो.

Malaysia Visa Rules
Narendra Modi Malaysia visit | मलेशिया दौर्‍यातून काय साधले?

व्हिसा शुल्क परत मिळणार नाही

या धोरणासोबतच, मलेशियाच्या इमिग्रेशन विभागाने स्पष्ट केले आहे की, व्हिसा प्रक्रिया शुल्क (visa processing fee) परत मिळणार नाही. म्हणजेच कोणत्याही परिस्थितीत हे शुल्क परत केले जाणार नाही. तुमचा व्हिसा मंजूर होवो किंवा नाकारला जावो, शुल्क परत मिळणार नाही. तसेच, धोरणात काही बदल झाल्यास किंवा तुमच्या प्रवास योजनांमध्ये बदल झाल्यासही हे शुल्क परत केले जाणार नसल्‍याचे स्‍पष्‍ट केले आहे.

मलेशियाकडून ३१ देशांच्या नागरिकांसाठी निर्बंध

व्हिसा-मुक्त प्रवेश बंद करण्यासोबतच, मलेशियाने प्रवास विम्याच्या संदर्भातही काही बदल केले आहेत. १ सप्टेंबर २०२६ पासून, मलेशियाने ३१ देशांच्या नागरिकांसाठी 'मल्टिपल-एन्ट्री' (अनेकदा प्रवेशाची परवानगी देणाऱ्या) व्हिसा जारी करण्यावरही निर्बंध घातले आहेत. आता अशा प्रकारचे व्हिसा केवळ व्यावसायिक प्रवास, वैद्यकीय उपचार, विवाह-संबंधित पर्यटन किंवा 'फ्लाय-अँड-क्रूझ' (विमानाने येऊन क्रूझ प्रवासाला जाणे) उद्देशाने प्रवास करणाऱ्या व्यक्तींनाच दिले जातील.

Malaysia Visa Rules
PM Narendra Modi | भारतातील व्यवसाय संधी साधा; पंतप्रधान मोदी यांचे मलेशियन व्यावसायिकांना आवाहन

वैद्यकीय विमा घेणेही अनिवार्य

इमिग्रेशन विभागाने प्रवाशांसाठी असा प्रवास वैद्यकीय विमा (ट्रॅव्हल मेडिकल इन्शुरन्स) घेणे अनिवार्य केले आहे. मलेशियातील त्यांच्या संपूर्ण वास्तव्याच्या कालावधीसाठी वैध असेल. मलेशियात असताना लागणाऱ्या वैद्यकीय उपचारांचा किंवा इतर आरोग्य सेवांचा खर्च संबंधित परदेशी नागरिकांना स्वतःच करावा लागेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.