Nepal Indian currency rules : नेपाळमध्ये २०० आणि ५०० रुपयांच्या भारतीय नोटांना परवानगी; जाणून घ्या नवीन नियम

केवळ १०० रुपयांपर्यंतच्या नोटांना परवानगी देणारी सुमारे दशकभराची बंदी संपुष्टात
Nepal Indian currency rules
Nepal Indian currency rulesFile Photo
Published on
Updated on

Nepal Indian currency rules : नेपाळने भारतीय आणि नेपाळी नागरिकांना २०० आणि ५०० रुपयांच्या भारतीय नोटा देशात आणण्याची किंवा बाहेर नेण्याची परवानगी दिली आहे. यामुळे २०१६ च्या नोटाबंदीनंतर लागू असलेली आणि केवळ १०० रुपयांपर्यंतच्या नोटांना परवानगी देणारी जवळपास दशकभराची बंदी संपुष्टात आली आहे.

केवळ २५ हजार रुपयांपर्यंत मर्यादा

नेपाळ राष्ट्र बँकेने (NRB) गुरुवारी पुन्हा जारी केलेल्या एका सूचनेत म्हटले आहे की, विद्यमान नियमांनुसार भारतीय आणि नेपाळी नागरिक ९ नोव्हेंबर २०१६ रोजी किंवा त्यानंतर जारी केलेल्या २०० आणि ५०० रुपयांच्या भारतीय नोटा, प्रति व्यक्ती २५,००० रुपयांच्या मर्यादेपर्यंत सोबत बाळगू शकतात.आवश्यक नियम तयार केल्यानंतर ११ फेब्रुवारी रोजी नेपाळच्या राजपत्रामध्ये (गॅझेट) प्रकाशित सूचनेद्वारे या तरतुदींची माहिती आधीच देण्यात आली होती; तरीही, नियमांची पुन्हा आठवण करून देण्यासाठी आणि त्यांच्या अंमलबजावणीबाबत स्पष्टता आणण्यासाठी NRB ने ही सूचना पुन्हा जारी केली.

Nepal Indian currency rules
US Citizen Arrest Near Nepal: अमेरिकेची भारतात लुडबूड..? नेपाळ जवळ संशयास्पद हालचाली करणाऱ्या माजी US Navy अधिकाऱ्याला अटक

नेपाळी नागरिकांनाही भारतीय चलनाबाबत नियम लागू

नवीन नियमांचे स्पष्टीकरण देताना NRB चे प्रवक्ते गुरु प्रसाद पौडेल यांनी शनिवारी सांगितले की, नेपाळी नागरिक भारताव्यतिरिक्त इतर कोणत्याही देशातून नेपाळमध्ये भारतीय चलन आणू शकत नाहीत. तसेच, ते नेपाळमधून भारताव्यतिरिक्त तिसऱ्या देशात भारतीय चलन नेऊ शकत नाहीत.त्यांनी सांगितले की, या सुधारित तरतुदीमुळे नेपाळला भेट देणाऱ्या भारतीय पर्यटकांना आणि भारतासोबत व्यापार व व्यवसाय करणाऱ्या नेपाळी नागरिकांना सोयीचे ठरेल.

Nepal Indian currency rules
India Nepal border tax relief | भारत-नेपाळ सीमेवर सर्वसामान्यांना मोठा दिलासा; टॅक्स नियमाला नेपाळ सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती

परदेशी पर्यटकांना ५,००० अमेरिकन डॉलर्सचा नियम

सूचनेत असेही म्हटले आहे की, नेपाळी नागरिक आणि परदेशी पर्यटक ५,००० अमेरिकन डॉलर्स (USD) किंवा इतर परकीय चलनातील त्यास सममूल्य रक्कम कोणत्याही 'कस्टम्स डिक्लेरेशन'शिवाय (सीमाशुल्क घोषणा) नेपाळमध्ये आणू शकतात.५,००० अमेरिकन डॉलर्सपेक्षा जास्त रक्कम असल्यास, नेपाळमध्ये आगमन झाल्यावर कस्टम्स विभागाकडे त्याची घोषणा करणे आवश्यक आहे.

Nepal Indian currency rules
Nepal Protest : अखेर Gen Z पुढं नेपाळ सरकार झुकलं! सोशल मीडियावरची बंदी हटवली मात्र...

.. तर 'कस्टम्स डिक्लेरेशन' करणे अनिवार्य

प्रवासी ५,००० अमेरिकन डॉलर्सच्या (सुमारे ४.८३ लाख रुपये) सममूल्य रक्कम 'कस्टम्स डिक्लेरेशन'शिवाय आणू शकतात, परंतु अट अशी आहे की त्यामध्ये १०० रुपयांपेक्षा जास्त मूल्याच्या नोटा नसाव्यात.तथापि, जर रक्कम ५,००० अमेरिकन डॉलर्सच्या मर्यादेपेक्षा जास्त असेल, तर 'कस्टम्स डिक्लेरेशन' करणे अनिवार्य आहे, असेही त्यांनी नमूद केले. भारताने ८ नोव्हेंबर २०१६ रोजी ५०० आणि १,००० रुपयांच्या चलनी नोटा रद्द (नोटाबंदी) केल्या होत्या. त्याऐवजी ५०० रुपयांच्या सुधारित डिझाइनच्या नोटा आणि २,००० रुपयांच्या नवीन नोटा चलनात आणल्या गेल्या होत्या; मात्र २,००० रुपयांच्या नोटा नंतर चलनातून मागे घेण्यात आल्या.

Nepal Indian currency rules
Sharad Pawar On Devendra Fadnavis : नेपाळ होऊ देऊ नका.... शरद पवारांचा 'देवाभाऊं'ना इशारा

भारतातील नोटाबंदीनंतर नेपाळमधील नियमांमध्‍ये बदल

भारतात नोटाबंदीनंतर, नेपाळने १०० रुपयांपेक्षा जास्त मूल्याच्या भारतीय चलनी नोटांच्या प्रवेशावर आणि वापरावर बंदी घातली होती. भारतीय चलन बाळगण्याबाबतची २५,००० रुपयांची मर्यादा कायम असली, तरी प्रवाशांना प्रत्यक्षात केवळ १०० रुपये किंवा त्यापेक्षा कमी मूल्याच्या नोटा बाळगण्यापुरतेच मर्यादित राहावे लागत होते. सुधारित नियमांनुसार, आता भारतीय आणि नेपाळी नागरिकांना २५,००० रुपयांच्या विद्यमान मर्यादेच्या अधीन राहून, ९ नोव्हेंबर २०१६ नंतर जारी करण्यात आलेल्या ५०० रुपयांच्या (सुधारित डिझाइनच्या) आणि २०० रुपयांच्या नोटा बाळगण्याची परवानगी देण्यात आली आहे.त्या तारखेपूर्वी जारी करण्यात आलेल्या ५०० आणि १,००० रुपयांच्या भारतीय चलनी नोटांवर नेपाळमध्ये बंदी कायम राहणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news