Sharad Pawar On Devendra Fadnavis : नेपाळ होऊ देऊ नका.... शरद पवारांचा 'देवाभाऊं'ना इशारा

यावेळी त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भारताच्या आजूबाजूला पाहा काय परिस्थिती आहे हे पाहण्याचा सल्ला दिला.
Sharad Pawar Devendra Fadnavis
Sharad Pawar Devendra Fadnaviscanva
Published on
Updated on

Sharad Pawar Devendra Fadnavis :

नाशिमध्ये आज (दि. १५) राष्ट्रवादी शरद पवार गटाचा शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात शेतकरी आक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला होता. यावेळी खासदार शरद पवार यांनी मोर्चाला संबोधित करत भाषण केल. यावेळी त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भारताच्या आजूबाजूला पाहा काय परिस्थिती आहे हे पाहण्याचा सल्ला दिला.

'नेपाळमध्ये गेल्या ८ दिवसात काय घडलंय ते पाहा राज्यकर्ते गेले. एक भगिनी आली. तिच्या हातात राज्य दिलं गेलं. अजून काय झालं त्याच्या खोलात जात नाही. मात्र शहाणपणा हा शिकण्याचं काम हे देवाभाऊ आणि त्यांचे सहकारी करतील अशी आशा व्यक्त करतो. असं म्हणत शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चिमटा काढला.

Sharad Pawar Devendra Fadnavis
Puja Khedkar News : पोलिसांवर सोडले कुत्रे...? पूजा खेडकरांच्या कुटुंबियांवर गुन्हा दाखल

शरद पवार यांनी नाशिकमधील शेतकरी आक्रोश मोर्चावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या पोस्टर आणि जाहिरातबाजीवरून टोला लागवाला. यावेळी त्यांनी फडणवीस यांचा उल्लेख देवाभाऊ असा केला.

ते म्हणाले, 'राज्यकर्त्यांना शेतकऱ्यांचे दुखणे समजत नाही. देवाभाऊ सगळ्या महाराष्ट्रात तुमचर पोस्टर लावले. शिवाजी महाराजांचे दर्शन घेत असल्याचे दाखवले. शिवाजी महाराजांच्या काळात फाळ नव्हता त्याला सोन्याचा फाळ दिला होता. बळीराजा उपाशी राहत कामा नये. तो आदर्श देवाभाऊ घेतील असे वाटले होते पण त्यांनी तसे केलं नाही.

फडणवीसांना इशारा देत ते पुढे म्हणाले, राज्यकर्ते बळीराज्यकडे लक्ष देत नाही. शेतकऱ्यांचा मोर्चा दखल घेतली नाहीतर मोर्चा आणखी उग्र स्वरूपात होईल.'

नाशिकमधील शेतकरी आक्रोश मोर्चावेळी शरद पवार यांनी राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर देखील भाष्य केलं. ते म्हणाले, 'काळ्या आईशी इमान राखणारा भाऊ बहिण अस्वस्थ आहे. कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळ असतो. अतिवृष्टी झाला त्याचा परिणाम शेतकरी वर्गावर झाला. संकट आल्यावर राज्य आणि केंद्राची जबाबदारी असते. जबाबदारी घ्यायला आजचे राज्यकर्ते तयार नाही.'

शरद पवार यांनी आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची आकडेवारीच ठेवली. ते म्हणाले, 'गेल्या २ महिन्यात २ हजार पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतकरी जीव देतो, एवढी टोकाची भूमिका घेतो. संकटाच्या काळात राज्यकर्ते त्याच्या मागे उभे राहत नाही. म्हणून जीव देण्याचा विचार शेतकरी करतोय.'

Sharad Pawar Devendra Fadnavis
Sharad Pawar : आरक्षणासंदर्भात सर्वसमावेशक भूमिका हवी

पवार यांनी ते ज्यावेळी केंद्रीय कृषी मंत्री होते त्यावेळेचे उदारहण देखील दिलं. ते म्हणाले, 'मी शेती खात्याचा मंत्री होतो. माझ्या वाचनात आलो शेतकरी आत्महत्येची घटना आल. पंतप्रधान मनमोहन सिंग यांना विनंती केली. शेतकरी जीव देतो ते समजून घेतले पाहिजे. दिल्लीत बसून होणार नाही जिल्ह्यात जाऊन समजून घेऊ असे सांगितले.'

ते पुढे म्हणाले, 'पंतप्रधान सिंग तयार झाले आणि नागपूर, अमरावती यवतमाळला गेलो. आत्महत्या केलेल्या कुटुंबाला आम्ही भेट घेतली. शेतकऱ्यांची बायको ढसाढसा रडतेय. मी विचारलं का रडतेय. सोसायटीचे कर्ज काढले होते ते थकले. खाजगी सावकाराकडील कर्ज थकले. भांडे घेऊन गेला, मालकांला सहन झालं नाही. रडता रडता जीव गेला. यानंतर कर्जबाजारी हा मोठा रोग आहे त्यावर उपार केला पाहिजे. म्हणून आम्ही ७० हजार कोटी रूपये देऊन कर्जमाफी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news