NEET फेरपरीक्षा आज: हवाई दलाद्वारे पहिल्यांदाच पोहोचवल्या प्रश्नपत्रिका; केंद्रावर जाताना 'या' गोष्टी नक्की सोबत ठेवा

देशभरात आज नीट यूजी २०२६ फेरपरीक्षा होत आहे. देशांतर्गत आणि परदेशातील परीक्षा केंद्रांवर २२.७९ लाखांहून अधिक विद्यार्थी या फेरपरीक्षेला बसले आहेत.
NEET UG 2026
NEET UG 2026file photo
Published on
Updated on

NEET UG 2026

नवी दिल्ली : देशभरात आज नीट यूजी २०२६ फेरपरीक्षा होत आहे. देशांतर्गत आणि परदेशातील परीक्षा केंद्रांवर २२.७९ लाखांहून अधिक विद्यार्थी या फेरपरीक्षेला बसले आहेत. सुरक्षितता आणि पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी यावेळी सुरक्षा व्यवस्थेत अभूतपूर्व बदल करण्यात आले आहेत.

२२.७९ लाख उमेदवार नीटसाठी सज्ज झाले आहेत. यात महाराष्ट्रातील ३५ केंद्रांवर २ लाख २० हजार विद्यार्थ्यांचा समावेश आहे. परीक्षेसाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ही परीक्षा पारदर्शक आणि भयमुक्त वातावरणात व्हावी यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्याची माहिती नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या सूत्रांनी दिली. यापूर्वी नीटचे पेपर फुटले होते आणि त्यावरून मोठा गदारोळ माजला होता. त्यामुळे ही परीक्षा नव्याने घेण्यात येणार आहे.

NEET UG 2026
NEET UG Re Exam 2026 : फेरपरीक्षा ‘नीट’ होणार का? विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली

वायुदलाची महत्त्वाची भूमिका

प्रश्नपत्रिकांच्या सुरक्षिततेसाठी 'नॅशनल टेस्टिंग एजन्सी'ने पहिल्यांदाच भारतीय वायुदलाची मदत घेतली आहे. देशभरातील विविध 'स्ट्रॉन्ग रूम्स' आणि परीक्षा केंद्रांपर्यंत प्रश्नपत्रिका सुरक्षितपणे पोहोचवण्यासाठी वायुदलाच्या हेलिकॉप्टर्स आणि विमानांनी २०० हून अधिक फेऱ्या पूर्ण केल्या आहेत. देशभरात २ लाखांहून अधिक सुरक्षा आणि परीक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. ही परीक्षा इंग्रजी आणि हिंदीसह १२ भारतीय भाषांमध्ये घेतली जाईल. या संपूर्ण प्रक्रियेसाठी ३ लाखांहून अधिक कर्मचारी आणि अधिकारी कार्यरत आहेत.

नागपुरातील विद्यार्थ्याला अबुधाबी परीक्षा केंद्र बदलून दिलं

नीट यूजी २०२६ फेरपरीक्षेसाठी नागपूरमधील एका विद्यार्थ्याला अबुधाबी येथे परीक्षा केंद्र आल्यानंतर पुन्हा एकदा या प्रक्रियेतील भोंगळपणा समोर आला. यावर एनटीएने शनिवारी अधिकृत स्पष्टीकरण दिले. संबंधित विद्यार्थ्याने स्वतःच्या लॉगिनवरूनच 'अबुधाबी' परीक्षा केंद्राची निवड केली होती. तरीही 'विद्यार्थी प्रथम' धोरण राखून ऐनवेळी त्याचे केंद्र बदलून देण्यात आल्याचे एनटीएने स्पष्ट केले.

परीक्षा केंद्रावर जाताना 'या' गोष्टी नक्की सोबत ठेवा

एनटीएने विद्यार्थ्यांना त्यांचे प्रवेशपत्र, ओळखपत्र आणि दोन फोटो घेऊन नियोजित वेळेनुसार परीक्षा केंद्रांवर पोहोचण्याची सूचना दिली आहे. उष्णतेची लाट लक्षात घेता, केंद्रांवर पिण्याचे पाणी, वीज आणि पंखे यांसारख्या विशेष व्यवस्था करण्यात आल्या आहेत, तसेच पालकांसाठी बाहेर बसण्याची सोयही करण्यात आली आहे.

NEET UG 2026
NEET-UG परीक्षेत मोठे बदल! पुढील वर्षापासून अनेक सत्रांमध्ये आणि टप्प्यांमध्ये होणार?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news