NEET UG 2026: NEET UG मध्ये मोठा बदल! किती वेळा परीक्षा देता येणार, वयोमर्यादा किती असणार? जाणून घ्या

NEET UG 2026: NEET UG 2026 परीक्षेत मोठे बदल होण्याची शक्यता असून NTA वयोमर्यादा आणि Attempt Limit लागू करण्याच्या तयारीत आहे.
NEET UG 2026
NEET UG 2026Pudhari
Published on
Updated on

NEET UG 2026: NEET UG 2026 परीक्षेत मोठा बदल होण्याची शक्यता आहे. पेपरफुटी आणि परीक्षा रद्द झाल्यानंतर आता National Testing Agency (NTA) वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या प्रणालीत मोठे बदल करण्याच्या तयारीत आहे. भविष्यात NEET UG परीक्षेसाठी वयोमर्यादा (Age Limit) आणि प्रयत्न मर्यादा (Attempt Limit) लागू केली जाऊ शकते. म्हणजेच, विद्यार्थ्यांना ठराविक वयापर्यंत आणि मर्यादित वेळाच परीक्षा देता येऊ शकते.

केंद्र सरकारने गुरुवारी संसदीय समितीसमोर सांगितले की, माजी इस्रो प्रमुख के. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखालील तज्ज्ञ समितीच्या शिफारशींनुसार परीक्षा व्यवस्थेत मोठे बदल केले जाणार आहेत. काँग्रेस खासदार दिग्विजय सिंह यांच्या अध्यक्षतेखालील संसदीय स्थायी समितीसमोर NTA ने दीर्घकालीन सुधारणांचा आराखडा मांडला आहे.

NEET मध्ये पहिल्यांदाच लागू होऊ शकते Attempt Limit

सध्या NEET UG परीक्षेसाठी किमान वय 17 वर्षे निश्चित आहे. मात्र, कमाल वयोमर्यादा नाही आणि विद्यार्थी कितीही वेळा परीक्षा देऊ शकतात. पण आता या व्यवस्थेत बदल होण्याचे संकेत मिळत आहेत. भविष्यात विद्यार्थ्यांना किती वेळा परीक्षा देता येईल, यावर मर्यादा घालण्याचा विचार सुरू आहे. यासोबतच कमाल वयोमर्यादा लागू करण्याचाही प्रस्ताव चर्चेत आहे. मात्र, विद्यार्थ्यांना नेमके किती प्रयत्न मिळतील किंवा वयाची कमाल मर्यादा किती असेल, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही.

NEET UG 2026
MS Dhoni CSK Playoffs: ‘थाला’ पुन्हा खेळणार? CSK कोचने दिली धोनीबाबत मोठी अपडेट; 'या' एका कारणामुळे संघाबाहेर

परीक्षा पूर्णपणे Computer-Based होणार?

NTA ने समितीला सांगितले की, भविष्यात NEET UG परीक्षा पूर्णपणे Computer-Based Test (CBT) पद्धतीने घेण्याची तयारी सुरू आहे. तसेच मल्टी-सेशन आणि मल्टी-स्टेज परीक्षा प्रणालीवरही काम सुरू आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी यापूर्वीच पुढील वर्षी NEET परीक्षा CBT मोडमध्ये घेण्याची शक्यता व्यक्त केली होती.

सध्या NTA एका शिफ्टमध्ये सुमारे 1.5 लाख विद्यार्थ्यांची CBT आधारित परीक्षा घेऊ शकते. मात्र, पुढील वर्षापर्यंत ही क्षमता 10 लाखांपर्यंत वाढवण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

पेपर वादानंतर सुधारणांना वेग

NEET UG 2026 यंदा मोठ्या वादात सापडली होती. 3 मे रोजी झालेल्या परीक्षेत 22 लाखांहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यानंतर व्हायरल झालेल्या गेस पेपरमधील सुमारे 120 प्रश्न मूळ परीक्षेशी जुळत असल्याचे आरोप झाले.

NEET UG 2026
Kedarnath Viral Video: केदारनाथमध्ये धक्कादायक प्रकार! महाराष्ट्रातील शिक्षकाने घोडेवाहकाला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल

NTA च्या माहितीनुसार, 7 मे रोजी गैरप्रकारांची माहिती मिळाली, त्यानंतर 8 मे रोजी प्रकरण केंद्रीय यंत्रणांकडे पाठवण्यात आले आणि अखेर 12 मे रोजी परीक्षा रद्द करण्यात आली. आता ही परीक्षा 21 जून रोजी पुन्हा होणार आहे.

मात्र, संसदीय समितीच्या बैठकीत NTA ने याला थेट ‘पेपर लीक’ म्हणण्यास नकार दिला. एजन्सीच्या मते, परीक्षेत गैरप्रकार आणि अनियमितता आढळल्या, पण त्याला पूर्णपणे पेपर लीक म्हणणे योग्य ठरणार नाही. यावर विरोधकांनी प्रश्न उपस्थित करत, “जर पेपर लीक झाला नसेल तर परीक्षा रद्द का करावी लागली?” असा सवाल केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news