NEET Exam Scam: नीट परीक्षा गोंधळ,सुप्रीम कोर्टात याचिका

'नीट' च्या याचिकेवर ८ जुलैला सुनावणी
NEET Exam Scam
नीट परीक्षा गोंधळाबाबत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली.Pudhari File Photo
प्रथमेश तेलंग

नवी दिल्ली : नीट परीक्षेतील कथित पेपरफुटी आणि गोंधळाची ईडीमार्फत चौकशी करण्याच्या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर ८ जुलै रोजी सुनावणी होणार आहे.

शिवानी मिश्रा आणि १० याचिकाकर्त्यांच्या याचिकेवर न्यायमूर्ती ए. एस. ओका आणि न्यायमूर्ती राजेश बिंदल यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. नीटचा तपास ईडीकडे सोपवावा आणि मनी लाँडरिंग कायद्याअंतर्गत दोषींवर कारवाई करावी, अशी याचिकाकर्त्यांची मागणी आहे. नीट परीक्षेतील ओएमआर शीटमध्ये छेडछाड केल्याप्रकरणी दाखल याचिकेवरही ८ जुलै रोजी सुनावणी होणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news