NEET पेपरफुटी रोखण्यासाठी 'मास्टरप्लॅन'! परीक्षा सुधारणा कार्यगटाचे प्रमुख निलेकणींनी केली एक महत्त्वपूर्ण सूचना

NEET Paper Leak Prevention Reforms : देशभरात परीक्षा केंद्रांच्या नेटवर्कवरही दिला भर
NEET Paper Leak Prevention Reforms
नंदन निलेकणी
Published on: 
Updated on: 

NEET Paper Leak Prevention Reforms : भारतात वैद्यकीय (Medical) क्षेत्रातील पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतली जाणारी NEET (राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा) ही एक केंद्रीय प्रवेश परीक्षा आहे. या परीक्षांमध्ये वारंवार होणाऱ्या पेपरफुटीच्या घटनांबाबत चिंता व्यक्त केली जात असताना, परीक्षा सुधारणा कार्यगटाचे प्रमुख नंदन निलेकणी यांनी एक महत्त्वपूर्ण सूचना केली आहे.

नंदन निलेकणी यांनी सांगितल्‍या दोन प्रमुख शिफारसी

परीक्षा सुधारणा कार्यगटाचे प्रमुख नंदन निलेकणी यांनी आज (दि. १३) प्रस्ताव मांडला की, NEET पेपरफुटीचा धोका टाळण्यासाठी, एका मोठ्या 'प्रश्न-संचया'तून (Question Bank) प्रश्नपत्रिका ऐनवेळी तयार केल्या जाव्यात. तसेच, त्यांनी संगणक-आधारित परीक्षा पद्धतीकडे (CBT) वळण्याचीही शिफारस केली आहे.

NEET Paper Leak Prevention Reforms
NEET UG admission : तीन खासगी विद्यापीठांतील ४० टक्के कोट्याने विद्यार्थी संभ्रमात

प्रश्नपत्रिका ऐनवेळी तयार करणे

'ब्लूमबर्ग न्यू इकॉनॉमी फोरम'मध्ये बोलताना नंदन निलेकणी म्हणाले की, NEET सारख्या परीक्षांसाठी आधीच तयार करून ठेवलेल्या प्रश्नपत्रिकांमुळे त्या बेकायदेशीरपणे विकण्याचे आर्थिक प्रलोभन निर्माण होते. परीक्षेच्या दिवशीच 'रँडमली' (यादृच्छिक पद्धतीने) प्रश्नपत्रिका तयार केली गेली, तर निश्चित प्रश्नपत्रिकेची समस्याच उरणार नाही आणि परिणामी पेपरफुटीमागील आर्थिक हेतूही संपुष्टात येईल.

AI चा वापर करून प्रश्नपत्रिका तयार करणे शक्य

परीक्षेच्या दिवशीच 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स' (AI) द्वारे प्रश्नपत्रिका त्वरित तयार करणे शक्य आहे का, असे विचारले असता निलेकणी यांनी याला स्पष्ट दुजोरा दिला. ते म्हणाले, "हो, नक्कीच; आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) परीक्षेच्या दिवशीच एका मोठ्या प्रश्न-संचयातून प्रश्नपत्रिका तयार करू शकते."

NEET Paper Leak Prevention Reforms
NEET protest debate Parliament : अमित शहा चर्चेसाठी तयार; राहुल गांधी म्‍हणाले, "त्‍यांच्‍या उपदेश ऐकण्‍यात रस नाही"

संगणक-आधारित परीक्षा पद्धतीकडे वळण्यावर भर

निलेकणी यांनी सर्व परीक्षा संगणक-आधारित परीक्षा पद्धती (CBT) ने घेतल्या पाहिजेत, यावर भर दिला. ते म्हणाले, "NEET सारखी परीक्षा संगणक-आधारित असावी. यासाठी देशभरात परीक्षा केंद्रांचे जाळे आवश्यक आहे. सध्या आपल्याकडे १,५०,००० केंद्रे आहेत, जिथे विद्यार्थी परीक्षा देऊ शकतात; या जाळ्याचा विस्तार करणे गरजेचे आहे," असेही त्यांनी स्पष्ट केले.

निर्णय अंमलात आणण्यासाठी पंतप्रधान उत्सुक

"मला वाटते की हे सर्व प्रणालीगत मुद्दे आहेत, ज्यांवर आमची समिती काम करेल आणि आमचे निर्णय अंमलात आणण्यासाठी पंतप्रधान खूप उत्सुक आहेत," असेही नंदन निलेकणी यांनी यावेळी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news