NEET परीक्षेआधी मोठा धक्का? पेपर फुटल्याचा दावा; विद्यार्थ्याला व्हिडीओ कॉलवर दाखवली प्रश्नपत्रिका

आज नीट परीक्षा होत असतानाच पेपरफुटीचा संशय निर्माण करणारी घटना समोर आली आहे.
neet exam paper leak
NEET paper leakfile photo
Published on
Updated on

NEET paper leak

अजमेर : आज नीट यूजी फेरपरीक्षा 2026 होत असतानाच पेपरफुटीचा संशय निर्माण करणारी घटना समोर आली आहे. राजस्थानातील अजमेरमधील एका नीट परीक्षार्थीला अज्ञात व्यक्तीने व्हिडीओ कॉल करून कथित प्रश्नपत्रिका दाखवली आणि ती मिळवून देण्यासाठी ३० हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

या संदर्भात डीएव्ही महाविद्यालयाच्या विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष तसेच एबीव्हीपी सदस्य कृष्णा सिंह ठाकूर यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार, आज होणाऱ्या नीट परीक्षेला बसणाऱ्या डीएव्ही महाविद्यालयातील प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्याला शनिवारी एका अज्ञात क्रमांकावरून फोन आला.

neet exam paper leak
NEET फेरपरीक्षा आज: हवाई दलाद्वारे पहिल्यांदाच पोहोचवल्या प्रश्नपत्रिका; केंद्रावर जाताना 'या' गोष्टी नक्की सोबत ठेवा

फोन करणाऱ्या व्यक्तीने स्वतःकडे नीटची प्रश्नपत्रिका असल्याचा दावा करत परीक्षा सुरू होण्यापूर्वी ती उपलब्ध करून देण्याची ऑफर दिली. विद्यार्थ्याने पुरावा मागितल्यानंतर संबंधित व्यक्तीने व्हिडीओ कॉलद्वारे कथित प्रश्नपत्रिका दाखवल्याचा आरोप आहे.

कृष्णा सिंह ठाकूर यांनीही त्याच क्रमांकावरून आपल्याला फोन आल्याचा दावा केला आहे. या संभाषणात संबंधित व्यक्तीने ३० हजार रुपयांच्या मोबदल्यात प्रश्नपत्रिका देण्याची तयारी दर्शवली आणि ऑनलाइन पेमेंटसाठी क्रमांकही पाठवला. ठाकूर यांनी या फोनचे रेकॉर्ड पोलिसांकडे सुपूर्द केले आहे.

अतिरिक्त पोलिस अधीक्षक हिमांशू जागिड यांनी सांगितले की, तक्रार प्राप्त झाल्यानंतर तपासासाठी विशेष पथक नियुक्त करण्यात आले आहे. फोन करणाऱ्या व्यक्तीची ओळख पटविणे तसेच व्हिडीओ कॉलमध्ये दाखवण्यात आलेली प्रश्नपत्रिका खरी होती का, याची पडताळणी सुरू आहे.

दरम्यान, पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, प्राथमिक तपासात हा प्रकार रविवारी होणाऱ्या नीट पुनर्परीक्षेच्या उमेदवारांची फसवणूक करण्यासाठी रचलेला डाव असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मात्र, संपूर्ण सत्य तपासानंतरच स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी नमूद केले.

neet exam paper leak
NEET चा पेपर ५ राज्यांमध्ये विकला, सर्वाधिक विक्री महाराष्ट्रात; अटक केलेल्या आरोपींच्या चौकशीतून धक्कादाय माहिती समोर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news