NEET 2026 चा पेपर फुटला? संभाव्य प्रश्नसंचात १०० हून अधिक मिळतेजुळते प्रश्न, चौकशी सुरू

वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची असलेल्या नीट परीक्षेवर पुन्हा एकदा पेपरफुटीचे सावट निर्माण झाले आहे.
NEET 2026 paper leak
NEET 2026 paper leakfile photo
Published on
Updated on

NEET 2026 paper leak

जयपूर: वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची असलेल्या नीट परीक्षेवर पुन्हा एकदा पेपरफुटीचे सावट निर्माण झाले आहे. ३ मे रोजी झालेल्या या परीक्षेतील प्रश्नांशी मिळता-जुळता असलेला संभाव्य प्रश्नसंच परीक्षेपूर्वीच सोशल मीडियावर फिरत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी राजस्थान पोलिसांच्या विशेष कृती दलाने सखोल चौकशी सुरू केली असून, नॅशनल टेस्टिंग एजन्सीने देखील या प्रकरणाची दखल घेतली आहे.

राजस्थानचे अतिरिक्त पोलीस महासंचालक विशाल बन्सल यांनी दिलेल्या माहितीनुसार, परीक्षेच्या काही दिवस आधी सुमारे ४०० प्रश्नांचा एक संभाव्य प्रश्नसंच व्हायरल झाला होता. या संचातील जीवशास्त्र आणि रसायनशास्त्र विषयांचे १०० हून अधिक प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेत विचारलेल्या प्रश्नांशी तंतोतंत जुळणारे आहेत. हा केवळ योगायोग आहे की एखादे मोठे रॅकेट, याचा तपास पोलीस करत आहेत. यासाठी राजस्थानमधील अनेक शहरे आणि डेहराडूनमध्ये चौकशी सुरू आहे.

NEET 2026 paper leak
NEET Exam Copy Case | नीट' परीक्षेत मोबाईलद्वारे कॉपी करणाऱ्या दोन विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल

लातूरपर्यंत धागेदोरे

राजस्थानप्रमाणेच महाराष्ट्रातील लातूरमधील एका नामांकित कोचिंग अकॅडमीचे काही व्हिडिओ आणि टेस्ट-सीरीजचे पेपर्स सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. या संदर्भात लातूरचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी सांगितले की, अद्याप स्थानिक स्तरावर कोणताही अधिकृत तपास सुरू करण्यात आलेला नाही. मात्र, या प्रकरणाचे धागेदोरे लातूरपर्यंत पोहोचल्याच्या चर्चेने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

NTA चे स्पष्टीकरण

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने शनिवारी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले की, ३ मे रोजीची परीक्षा पूर्ण सुरक्षा प्रोटोकॉल नुसारच पार पडली. संशयास्पद माहिती ७ मे रोजी उशिरा मिळाली आणि ८ मे रोजी सकाळी ती स्वतंत्र पडताळणी आणि आवश्यक कार्यवाहीसाठी केंद्रीय संस्थांकडे पाठवण्यात आली आहे. प्रामाणिकपणे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कष्टावर कोणताही अन्याय केला जाणार नाही, असेही एनटीएने स्पष्ट केले आहे.

तपास यंत्रणांनी शिक्षण मंत्रालयाला आपला अहवाल सादर केल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाईल, असे सांगण्यात आले आहे. दरम्यान, 'टाईम्स ऑफ इंडिया'ने दिलेल्या वृत्तानुसार, हे प्रकरण सध्या पडताळणीच्या टप्प्यावर असून अद्याप कोणताही अधिकृत गुन्हा दाखल झालेला नाही. एका अधिकाऱ्याने सांगितले की, "रसायनशास्त्र आणि जीवशास्त्राशी संबंधित सुमारे १०० प्रश्न नीटच्या पेपरशी जुळत असल्याचे दिसून येत आहे." राजस्थानचे कोचिंग हब असलेल्या सीकरसह अनेक ठिकाणी चौकशी सुरू केली आहे.

NEET 2026 paper leak
Viral News: असं फक्त भारतातच होऊ शकतं! एका विद्यार्थ्यासाठी एक केंद्र, ५ जणांचा स्टाफ; पण पठ्ठ्याने परीक्षेलाच मारली दांडी!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news