Indian Citizenship: गेल्या 5 वर्षांत 9 लाख भारतीयांनी नागरिकत्व सोडलं; काय आहे कारण?

Citizenship Exodus: गेल्या पाच वर्षांत जवळपास 9 लाख भारतीयांनी नागरिकत्व सोडलं आहे, अशी माहिती केंद्र सरकारने संसदेत दिली. परदेशात नोकरीच्या फसवणुकीमुळे आता भारतीय अधिक जागरूक होत असल्याचे सरकारने सांगितले.
Indians Renouncing Citizenship Latest Data
Indians Renouncing Citizenship Latest DataPudhari
Published on
Updated on

Indians Renouncing Citizenship Latest Data: भारतीय नागरिकांमध्ये परदेशात जाण्याचे प्रमाण वाढत असले, तरी गेल्या काही वर्षांत परदेशात होणाऱ्या फसवणुकीच्या घटनांनी अनेकांना धक्का बसला आहे. त्यामुळे आता भारतीय अधिक सावध होत असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. केंद्र सरकारने माहिती दिली की, गेल्या तीन वर्षांत भारतीय नागरिकत्व सोडणाऱ्यांची संख्या सुमारे 5 टक्क्यांनी कमी झाली आहे.

2024 मध्ये 2.06 लाखांनी सोडली नागरिकता

सरकारने राज्यसभेत दिलेल्या माहितीनुसार, 2024 मध्ये एकूण 2,06,378 व्यक्तींनी भारतीय नागरिकत्व सोडले आहे. 2023 मध्ये ही संख्या 2,16,219, तर 2022 मध्ये 2,25,620 होती. म्हणजेच सलग तीन वर्षे ही संख्या घसरताना दिसत आहे.

पाच वर्षांत तब्बल 8.96 लाख भारतीयांनी नागरिकत्व सोडले

केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री कीर्ती वर्धन सिंह यांनी राज्यसभेत दिलेल्या लेखी उत्तरात सांगितले की, 2019 ते 2024 या पाच वर्षांत 8,96,843 भारतीयांनी भारताचे नागरिकत्व सोडले आहे.

वर्षानुसार नागरिकत्व सोडणाऱ्यांची संख्या:

  • 2022 - 2,25,620

  • 2023 - 2,16,219

  • 2024 - 2,06,378

ही घसरण परदेशात होणाऱ्या रोजगार फसवणुकीमुळे झाली असल्याचे सरकारचे निरीक्षण आहे.

Indians Renouncing Citizenship Latest Data
India vs South Africa: 'या' तीन कारणांमुळे टीम इंडियाचा पराभव; भारताची संपूर्ण टीम का कोसळली?

भारत सरकारने परदेशात नोकरीच्या ऑफर देणाऱ्या एका कंपनीला नोटीस पाठवली आहे. ही कंपनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दक्षिण आशियाई देशांमध्ये रोजगाराचे आमिष दाखवत भारतीयांची फसवणूक करत होती. सरकारने सांगितले की, अशा प्रकारच्या फसवणुकीतून 6,700 भारतीयांना वाचवण्यात परराष्ट्र मंत्रालयाला यश आले आहे.

16,127 हून अधिक तक्रारी विदेश मंत्रालयाकडे

संसदेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना परराष्ट्र राज्यमंत्री यांनी सांगितले की, फक्त 2024–25 या वर्षातच परदेशात राहणाऱ्या भारतीयांकडून 16,127 तक्रारी आल्या आहेत.

  • 11,195 तक्रारी ‘मदद’ पोर्टलवर

  • 4,932 तक्रारी सीपीग्राम्सवर आल्या आहेत

Indians Renouncing Citizenship Latest Data
Demonetised Notes Scam: नोटबंदीला 9 वर्षे… तरीही दिल्लीमध्ये 3.60 कोटींच्या जुन्या नोटा जप्त; स्कॅमची पूर्ण स्टोरी

2011 ते 2019 दरम्यान किती लोकांनी नागरिकत्व सोडले?

भारताचे नागरिकत्व सोडण्याचा ट्रेंड नवा नाही. 2011 ते 2019 या कालावधीत तब्बल 11,89,194 भारतीयांनी नागरिकत्वाचा त्याग केला. काही वर्षांची आकडेवारी:

भारतीय परदेशात का जातात?

जास्त पगार, चांगल्या संधी, शिक्षण आणि चांगले जीवनमान यामुळे अनेक भारतीय परदेशात स्थायिक होणे पसंत करतात. परंतु, वाढत्या फसवणूक प्रकरणांमुळे लोक आता अधिक जागरूक होत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news