Sunetra Pawar : दिल्लीतल्या RSS बैठकीतील उपस्थितीसंदर्भात सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...

‘राष्ट्र सेविका समिती’च्या कार्यक्रमातील हजेरीवर विरोधकांकडून टीकेची झोड
ncp leader sunetra pawar first reaction on attending rss meeting in delhi
Published on
Updated on

ncp leader sunetra pawar first reaction on attending rss meeting in delhi

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या खासदार सुनेत्रा पवार यांनी राजधानी दिल्लीत आयोजित 'राष्ट्र सेविका समिती'च्या एका कार्यक्रमात हजेरी लावली. राष्ट्र सेविका समिती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित संघटना आहे. दरम्यान, या कार्यक्रमाचा एक फोटो समोर आला आणि त्यानंतर विरोधकांनी आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटावर टीकेची झोड उठवली आहे. दरम्यान, सुनेत्रा पवार यांनी आपली सोशल मीडियावर आपली भूमिका स्पष्ट केली.

नेमका कार्यक्रम काय होता?

भाजप खासदार कंगणा राणौत यांच्या निवासस्थानी 'राष्ट्र सेविका समिती' द्वारे एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला भाजप खासदार बांसुरी स्वराज, अपराजिता सारंगी या खासदारांसह सुनेत्रा पवार उपस्थित होत्या. दरम्यान, याच कार्यक्रमाबद्दल सोशल मीडियावर व्यक्त होताना कंगणा राणौत म्हणाल्या की, आपण एकत्रितपणे सनातन मूल्ये, हिंदू संस्कृती आणि राष्ट्रीय जाणीव अधिक प्रखर बनवू. मानव सेवा, राष्ट्रनिर्माण आणि सनातन संस्कृतीचे जतन करण्यासाठी सतत काम करण्याचा आमचा सर्वांचा संकल्प आहे. महिलांची जागरूकता आणि सहभागच राष्ट्राला बलवान बनवतो.

ncp leader sunetra pawar first reaction on attending rss meeting in delhi
Sunetra Pawar : सुनेत्रा पवार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित समितीच्या बैठकीत उपस्थित, चर्चांना उधाण

काय म्हणाल्या सुनेत्रा पवार?

एका मीटिंगमध्ये माझ्या उपस्थितीबाबत चर्चा सुरू आहे. याबाबत मी स्पष्टीकरण देऊ इच्छिते की, त्यामागे कोणताही राजकीय उद्देश्य नव्हता. यात इतर महिला खासदारही सहभागी होत्या. राज्यसभेच्या खासदार म्हणून आणि बारामतीमध्ये दीर्घकाळ सामाजिक कार्य करत असताना मला विविध महिला संघटनांच्या कामाची प्रत्यक्ष ओळख करून घेण्याची उत्सुकता असते. त्या बैठकीत विविध राज्यांतील महिला सहभागी होत्या. त्यांचे उपक्रम आणि कार्यपद्धती समजून घेण्यासाठीच मी तिथे गेले होते. त्या वेळी मला बोलण्यास सांगितले, तर मी फक्त दोन शब्दात माझी भूमिका मांडली. माझ्या या उपस्थितीचा राजकीय अर्थ काढू नये. समाजातील महिलांचे कार्य समजून घेणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे हाच माझा उद्देश होता, आहे आणि राहील, असे स्पष्टीकरण सुनेत्रा पवार यांनी दिले.

... म्हणून टीकेची झोड

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार गट भाजपसोबत येऊन सत्तेत सहभागी झाला. मात्र आम्ही शिव- फुले- शाहू- आंबेडकरांची विचारधारा सोडलेली नाही, असे वारंवार अजित पवार गटांच्या नेत्यांकडून सांगण्यात आले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संबंधित कार्यक्रमांपासून अजित पवार गटाच्या सर्व नेत्यांनी स्वतःला दूर ठेवले. मात्र पक्षफुटीनंतर सुनेत्रा पवार यांच्या रूपाने पहिल्यांदाच अजित पवार गटाचे कुठलेही नेते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित संघटनेच्या कार्यक्रमात सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे विरोधकांकडून अजित पवारांसह पक्षावर टीकेची झोड उठवली जात आहे.

ncp leader sunetra pawar first reaction on attending rss meeting in delhi
Delhi Police Commissioner : मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला.. पोलीस आयुक्तांची दुसऱ्याच दिवशीच उचलबांगडी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news