NCERT free online courses | ११ वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी SWAYAM प्लॅटफॉर्मवर मोफत कोर्सेस सुरू; असा करा अर्ज!

NCERT free online courses | तब्बल ११ विषयांचे ऑनलाइन कोर्सेस उपलब्ध
NCERT free online courses
प्रातिनिधिक छायाचित्र. Pudhari
Published on
Updated on

NCERT free online courses

नवी दिल्ली : देशातील इयत्ता ११ वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची दारे अधिक रुंदावत, 'नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग' (NCERT) ने एक मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या 'स्वयम' (SWAYAM) प्लॅटफॉर्मवर ११ वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी तब्बल ११ विषयांचे ऑनलाइन कोर्सेस पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्यात आले आहेत. शिक्षण सर्वांपर्यंत पोहोचावे आणि डिजिटल शिक्षणाला चालना मिळावी, या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात येत आहे. शालेय अभ्यासासोबतच स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे कोर्सेस अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत.

२१ आठवड्यांचे विशेष प्रशिक्षण

NCERT ने तयार केलेले हे कोर्सेस एकूण २१ आठवड्यांच्या कालावधीचे आहेत. यामध्ये अकाउंटन्सी, जीवशास्त्र, रसायनशास्त्र, अर्थशास्त्र, भूगोल, भौतिकशास्त्र, गणित, मानसशास्त्र, समाजशास्त्र, बिझनेस स्टडीज आणि इंग्रजी या महत्त्वाच्या विषयांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, विद्यार्थी त्यांच्या वेळेनुसार हे कोर्सेस पूर्ण करू शकतात.

NCERT free online courses
Four year undergraduate program : चार वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमाचा मार्ग मोकळा, मात्र पर्याय ऐच्छिक

काय असतील फायदे?

या कोर्सेसमध्ये केवळ पुस्तकी ज्ञान नसून, ऑडिओ-व्हिडिओ लेक्चर्स, शंका निरसनासाठी डिस्कशन फोरम्स आणि तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन मिळणार आहे. तसेच, स्वतःच्या अभ्यासाचे मूल्यमापन करण्यासाठी वेळोवेळी क्विझ आणि चाचण्या घेतल्या जातील. कोर्स यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना अधिकृत प्रमाणपत्रही दिले जाणार आहे.

NCERT free online courses
Autonomous colleges new rules : स्वायत्त महाविद्यालयांसाठी नवी नियमावली

विद्यार्थ्यांना ठराविक वेळेत नोंदणी करणे आवश्यक

  • नोंदणीची शेवटची तारीख: १ सप्टेंबर २०२४

  • परीक्षा नोंदणी: ७ ते ९ सप्टेंबर २०२४

  • अंतिम परीक्षा: १० ते १५ सप्टेंबर २०२४

  • कोर्स समाप्ती: १५ सप्टेंबर २०२४

NCERT free online courses
ITI Digital Library: राज्यातील चार आयटीआयमध्ये डिजिटल लायब्ररी उभारणार; विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानातून शिक्षण

अर्ज कसा करावा? (How to Apply)

विद्यार्थी खालील सोप्या स्टेप्स फॉलो करून नोंदणी करू शकतात

१. सर्वप्रथम SWAYAM पोर्टलवर जाऊन आपली नोंदणी करा.

२. आपल्या आवडीचा किंवा इयत्तेनुसार विषय निवडून 'Enrol' बटणावर क्लिक करा.

३. नोंदणी पूर्ण झाल्यावर अभ्यासासाठी साहित्य (Study Material) उपलब्ध होईल.

४. सर्व उपक्रम आणि अभ्यास पूर्ण करा.

५. प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अंतिम परीक्षेला बसणे अनिवार्य आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news