ITI Digital Library: राज्यातील चार आयटीआयमध्ये डिजिटल लायब्ररी उभारणार; विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानातून शिक्षण

नाशिक, पालघर, रत्नागिरी आणि बुलढाणा जिल्ह्यांची निवड; ई-बुक्स, एआय आधारित प्रशिक्षण आणि ऑनलाईन परीक्षांची सुविधा
ITI Digital Library
ITI Digital LibraryPudhari
Published on
Updated on

मुंबई : औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (आयटीआय) विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी नाशिक, पालघर, रत्नागिरी आणि बुलढाणा जिल्ह्यांतील प्रत्येकी एका आयटीआयमध्ये डिजिटल लायब्ररी उभारण्यात येणार आहे, यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाकडून सुमारे दोन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

ITI Digital Library
CBSE Exam: मध्यपूर्वेतील तणावाचा परीक्षांवर परिणाम; सीबीएसईने बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या

डिजिटल युगात पारंपरिक ग्रंथालयांबरोबरच डिजिटल लायब्ररीची गरज वाढत चालली आहे. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड वाढविण्यासोबतच ज्ञान आणि कौशल्यविकासाला चालना देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

रत्नागिरी येथील लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आयटीआय, पालघरमधील एकलव्य आदिवासी आयटीआय, नाशिकमधील महात्मा ज्योतिबा फुले आयटीआय आणि बुलढाण्यातील श्री पलसिद्ध महास्वामी आयटीआय या चार संस्थांची निवड करण्यात आली आहे. या ठिकाणी संगणक प्रणाली, नेटवर्किंग सुविधा, आवश्यक फर्निचर आणि इतर मूलभूत सुविधा उभारून डिजिटल प्रयोगशाळा विकसित केल्या जाणार आहेत.

ITI Digital Library
BMC Teachers: मुंबई पालिकेच्या 18 शिक्षिका 18 वर्षे फक्त 5 हजार मानधनावर; प्रशासनाच्या धोरणावर प्रश्न

डिजिटल लायब्ररीमुळे विद्यार्थ्यांना ई-बुक्स, व्हिडिओ ट्युटोरियल्स, ऑनलाईन कोर्स मटेरियल, प्रॅक्टिकल गाईड्स तसेच अभ्यासक्रमाशी संबंधित सैद्धांतिक व प्रात्यक्षिक साहित्य डिजिटल स्वरूपात उपलब्ध होणार आहे.

याशिवाय आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) तंत्रज्ञानाचा वापर करून डिजिटल प्रशिक्षण साहित्य उपलब्ध करून देण्याचीही योजना आहे. या सुविधेचा वापर संगणकाधारित ऑनलाईन परीक्षा घेण्यासाठीही केला जाणार आहे.

ITI Digital Library
Konkan Alphonso Export: इराण-इस्रायल युद्धाचा कोकण हापूसवर परिणाम; निर्यात ठप्प होण्याची भीती

यापूर्वी मुंबईतील नेताजी सुभाषचंद्र बोस आयटीआय आणि अमरावतीतील संत गाडगेबाबा आयटीआय येथे डिजिटल लायब्ररी उभारण्यास गतवर्षी मान्यता देण्यात आली होती. त्याच धर्तीवर आता आणखी चार आयटीआयमध्ये ही सुविधा सुरू करण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news