Navya Nair Controversy On Australia Melbourne :
मल्याळम चित्रपट अभिनेत्री नाव्या नायरची सोशल मीडिया पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे. ती ऑस्ट्रेलियातील मेलबर्न विमानतळावर पोहचली अन् तिच्या बाबतीत एक विचित्र घटना घडली. ऑस्ट्रेलियन एअरपोर्ट अधिकाऱ्यांनी तिला थांबवलं. अन् तिच्या केसात माळलेल्या फुलाबाबत विचारणा केली.
त्याचं झालं असं, नव्या नायर ज्यावेळी मेलबर्न आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरली त्यावेळी तिला विमानतळावरील अधिकाऱ्यांनी थांबवलं. तिला थांबवण्याचं कारण हे तिच्या केसात माळलेलं जास्मीनच फूल होत. ऑस्ट्रेलियामध्ये बायोसिक्युरिटी ही अत्यंत कडक आहे. बायोसिक्युरिटीच्या नियमांनुसार कोणत्याही प्रवाशाला झाड, फूल किंवा बिया घेऊन प्रवास करण्यास बंदी आहे. नव्याला या नियामाची कोणतीच कल्पना नव्हती. त्यामुळं तिला जवळपास १.१४ लाख रूपयांचा दंड भरावा लागला.
नव्या नायरनं हा किस्सा एका कार्यक्रमादरम्यान सांगितलं. तिनं सांगितलं की ज्यावेळी मी कोची विमानतळावरून ऑस्ट्रेलियासाठी रवाना होत होते. त्यावेळी मला माझ्या वडिलांनी जास्मीनच फूल दिलं होतं. त्या फुलाचा एक भाग आपल्या घरात आणि दुसरा भाग आपल्या बॅगमध्ये ठेवावा असं माझं प्लॅनिंग होतं. मात्र हेच प्लॅनिंग तिला महागात पडलं.
नव्या नायरनं आपली चूक मान्य केली अन् तिनं मला या नियमाची माहिती नव्हती असं सांगितलं. मात्र नियम माहिती नसणं हे काही कारण नाही. त्यामुळं नायरनं सांगितलं की मला एक चांगला धडा मिळाला.
दरम्यान, नायरनं शेअर केलेल्या पोस्टमध्ये तिने ओणमसाठी पारंपरिक वेश परिधान केला होता त्यावेळी तिनं जास्मीनचं फूल केसात माळलं होतं.