

पुढारी ऑनलाईन डेस्क : नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) ने आज शुक्रवारी (दि.१८) जेईई मेन २०२५ सत्र- २ ची अंतिम उत्तरसूची अधिकृतपणे जारी केली. जेईई मेन्स २०२५ सत्र- २ ची परीक्षा २ ते ९ एप्रिलदरम्यान एनटीएद्वारे घेण्यात आली होती. यानंतर ११ एप्रिलला एनटीएने तात्पुरती उत्तरसूची जारी केली होती. आता या परीक्षेची अंतिम उत्तरसूची जारी करण्यात आली आहे. ही परीक्षा दिलेले उमेदवार आता अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in वर उत्तरसूची पाहू शकतात.
जेईई (मेन) २०२५ सत्र-२ ची अंतिम उत्तरसूची आज १८ एप्रिल रोजी दुपारी २ वाजल्यापासून जेईई (मेन) वेबसाइटवरून डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध करण्यात आली आहे. जेईई मेन सत्र २ चा निकाल १९ एप्रिलपर्यंत जाहीर केला जाईल, अशी माहिती एनटीएने X वरील त्यांच्या अधिकृत हँडलवरील पोस्टद्वारे दिली आहे.
आयआयटी, एनआयटी, आयआयआयटी आणि इतर केंद्रीय अनुदानीत टॉप संस्थांमध्ये प्रवेश मिळविण्याचे उद्दिष्ट असलेल्या अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी जेईई मेन २०२५ सत्र २ परीक्षा महत्त्वाची आहे. आता अंतिम उत्तरसूची उपलब्ध झाल्याने विद्यार्थी त्यांची उत्तरे पडताळून पाहू शकतात. याचा निकाल १९ एप्रिल २०२५ पर्यंत जाहीर केला जाणार आहे.
जेईई मेन २०२५ सत्र २ ची अंतिम उत्तरसूची एनटीएचे अधिकृत पोर्टल, jeemain.nta.nic.in वर पाहता येईल. उमेदवार या वेबसाइटवर जाऊन answer key डाउनलोड करू शकतात. एकदा का उमेदवारांना अंतिम उत्तरसूची मिळाली की ते त्यांच्या उत्तरांची तुलना अधिकृत उत्तरसूचीशी करून त्यांच्या गुणाचा अंदाज लावू शकतात.
जेईई मेन निकाल 2025 जाहीर होताच विद्यार्थ्यांना jeemain.nta.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. वेबसाइटच्या होम पेजवर विद्यार्थ्यांना लेटेस्ट न्यूजमधील जेईई मेन्स सत्र- 2 निकाल लिंकवर क्लिक करावे लागेल. आता तुम्हाला अर्ज क्रमांक, पासवर्ड आणि कॅप्चा कोड टाकावा लागेल आणि लॉगिनवर क्लिक करावे लागेल. यानंतर निकाल स्क्रीनवर दिसेल. येथून विद्यार्थ्यांना तो डाऊनलोड करता येईल.