Narendr Modi oath ceremony : नरेंद्र मोदींच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला; जाणून घ्या वेळ

Narendr Modi oath ceremony
Narendr Modi oath ceremony
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : लोकसभा निवडणुकीचे निकाल स्‍पष्‍ट झाले. भाजप प्रणित एनडीएला स्‍पष्‍ट बहुमत मिळाले आहे. आता  नरेंद्र मोदी हे पंतप्रधानपदाची शपथ केव्‍हा आणि किती वाजता घेणार?, याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. रविवारी (दि. ९)  सायंकाळी ६ वाजता  नरेंद्र मोदी  पंतप्रधान म्हणून सलग तिसऱ्यांदा शपथ घेतील. Narendr Modi oath ceremony

'या' दिवशी 'या' वेळीला होणार शपथविधी

लोकसभा निवडणुकीचे निकाल मंगळवारी ( ४ जून) जाहीर झाले. ५४३ जागांपैकी भाजप 240 तर काँग्रेस 99 जागा जिंकल्या आहेत. भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडीला 292 तर इंडिया आघाडीने 234 जागांवर विजय मिळवला आहे. भाजपा नेते नरेंद्र मोदींची संसदीय पक्ष आणि एनडीए नेतेपदी निवड होत असल्याची घोषणा आज (दि.७ जून) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा यांनी केली. दरम्यान नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून तिसऱ्यांदा शपथ येत्या रविवारी ९ जून रोजी सायंकाळी ६ वाजता घेतील. असे भाजपा नेते प्रल्हाद जोशी यांनी NDA संसदीय पक्षाच्या बैठकीत सांगितले.

सूत्रांच्या माहितीनुसार,  या शपथविधीला सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पात काम करणारे मजूर, वंदे भारत आणि मेट्रो ट्रेनवर काम करणारे रेल्वेचे कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी, ट्रान्सजेंडर, केंद्र सरकारच्या योजनांचे लाभार्थी आणि विकसित भारत राजदूतांना मोदींच्या शपथविधी समारंभाला उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.

यंदा निकालानंतर ५  दिवसांनी शपथविधी सोहळा

लोकसभा निकाल ४ जूनरोजी लागला. निकालानंतर पाच दिवसांनी नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाची शपथ घेतील. यापूर्वी २०१९ मध्ये लोकसभा निवडणूक निकालानंतर ७ दिवसांनी पंतप्रधानपदाचा शपथविधी सोहळा पार पडला होता. २०१४ मध्ये जेव्हा १० दिवसांनी मोदींनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. यावेळी, निकाल जाहीर झाल्यानंतर ५ दिवसांनी म्हणजे ९ जूनरोजी शपथ घेतील.

तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर नरेंद्र मोदींच्या नावावर 'हा' विक्रम होईल

तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेताच नरेंद्र मोदींच्या नावावर नवा विक्रम होणार आहे. सलग तिसऱ्यांदा निवडणूक जिंकून देशाचे पंतप्रधान होणारे ते देशातील दुसरे नेते बनतील. यापूर्वी हा विक्रम पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या नावावर होता.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news