Narendra Modi | ब्रेकिंग: नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा संसदीय पक्ष NDA च्या नेतेपदी

Narendra Modi
Narendra Modi

पुढारी ऑनलाईन डेस्क: भाजपा नेते नरेंद्र मोदींची संसदीय पक्ष आणि एनडीए नेतेपदी निवड होत असल्याची घोषणा आज (दि.७ जून)पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा यांनी केली. यावेळी नरेंद्र मोदींच्या प्रयत्नांमुळेच विकास झाल्याचे नड्डा म्हणाले. सत्तास्थापनेपूर्वी नवनिर्वाचित खासदार आणि एनडीए पक्षातील नेत्यांची बैठक जुनी संसद भवनच्या संसदेच्या सेट्रल हॉलमध्ये सुरू आहे.

आपल्या सर्वांसाठी हा एक ऐतिहासिक क्षण आहे आणि आपण श्री नरेंद्र मोदी यांची सलग तिसऱ्यांदा NDA चे नेते म्हणून निवड करणार आहोत. आज आपण सर्वजण या ऐतिहासिक क्षणाचे प्रत्यक्षदर्शी आहोत. हे आपल्या सर्वांचे भाग्य आहे, असेही याप्रसंगी बोलताना जे.पी नड्डा म्हणाले.

राजनाथ सिंह यांच्याकडून NDA नेते पदाचा प्रस्ताव

मंत्रिमंडळातील त्यांचे (श्री नरेंद्र मोदीजी) सहकारी या नात्याने केवळ मीच नाही तर सर्व देशवासीयांनी मोदीजींची कार्यक्षमता, कार्यक्षमता, दूरदृष्टी आणि सत्यता प्रत्यक्ष पाहिली आहे. पुढील ५ वर्षे नरेंद्र मोदी यांनी नेतृत्त्व कारावं ही देशातील जनतेची इच्छा आहे.  असे म्हणत राजनाथ सिंह यांनी संसदीय पक्ष आणि एनडीए नेतेपदासाठी नरेंद्र मोदी यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला.

नरेंद्र मोदी यांच्या नावाला 'या' नेत्यांकडून अनुमोदन

राजनाथ सिंह यांच्या प्रस्तावाला अमित शहा आणि नितीन गडकरी या दोघांनीही अनुमोदन दिले आहे. तसेच "मोदींच्या नेतृत्त्वात देश विश्वगुरू बनेल" असे म्हणत टीडीपीचे चंद्राबाबू नायडू यांनी देखील राजनाथ सिंह यांच्या प्रस्तावाला अनुमोदन दिले. यासोबतच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, लोक जनशक्ती पार्टीचे प्रमुख चिराग पासवान, हिंदुस्थानी आवाम मोर्चाचे प्रमुख जीतनराम मांझी, अपना दल किंवा अपना दल (सोनीलाल) च्या  अनुप्रिया पटेल यांनी देखील नरेंद्र मोदी यांच्या नावाला सहमती दर्शवली.

मोदींच्या नेतृत्त्वात देश विश्वगुरू होणार; चंद्राबाबू नायडू

जे.पी.नड्डा, राजनाथ सिंह आणि नितीन गडकरी यांच्या सभांमुळे लोकांच्या मनात विश्वास निर्माण झाला. मोदींच्या नेतृत्त्वात आज देश अव्वल स्थानी आहे. जागतिक स्तरावर भारताचा गौरव करण्याचे संपूर्ण श्रेय मी नरेंद्र मोदी यांना देतो. त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही जगातील पाचव्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेत पोहोचलो आहोत , ते विकसित भारत व्हिजन 2047 ची योजना आखत आहेत, असे म्हणत टीडीपीचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांनी नरेंद्र मोदी यांच्या संसदीय पक्ष एनडीए नेतेपदाच्या नावाच्या प्रस्तावाला अनुमोदन दिले.

आम्ही नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखाली काम करू; नितीश कुमार

जनता दल (युनायटेड) चे प्रमुख नितीश कुमार म्हणाले, "बिहारची सर्व प्रलंबित कामे पूर्ण केली जातील. ही खूप चांगली गोष्ट आहे की आम्ही सर्व एकत्र आलो आहोत आणि आम्ही सर्व तुमच्यासोबत काम करू. पीएम मोदी तुम्ही पंतप्रधान म्हणून शपथ घ्याल, आम्ही सर्वजण तुमच्या नेतृत्वाखाली काम करू.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news