JJ Hospital resident doctor death: जे. जे.मध्ये 26 वर्षीय निवासी डॉक्टरने संपवलं आयुष्य

अभयसिंगच्या कुटुंबियांसह नातेवाईक आणि हॉस्टेलमधील इतर सहकारी निवासी डॉक्टरांचे जबाब पोलीस आता नोंदवणार आहेत.
JJ Hospital resident doctor death
JJ Hospital resident doctor deathPudhari
Published on
Updated on

मुंबई: मानसिक तणावतून आलेल्या नैराश्यातून अभयसिंग नरसिंग मोरे या 26 वर्षांच्या निवासी डॉक्टरने मंगळवारी दुपारी जे. जे रुग्णालयातील हॉस्टेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. अभयसिंग मोरे हा मूळचा मराठवाड्याच्या धाराशिव जिह्यातील वाशी दसेमगावचा रहिवाशी आहे. तो जे. जे रुग्णालयात रेडिओलॉजीच्या पहिल्या वर्षांत शिकत होता. त्याच्यावर मानसिक उपचारही सुरु होते. मंगळवारी दुपारी हॉस्टेलच्या सहाव्या मजल्यावरील रुम क्रमांक 604 मध्ये त्याच्याशिवाय कोणीही नव्हते. ही संधी साधून त्याने गळफास घेतला.

वरिष्ठांकडून हा प्रकार समजताच जे. जे मार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अभय सिंगला रुग्णालयात हलवले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. ही माहिती त्याच्या कुटुंबियांना देण्यात आली आहे.

JJ Hospital resident doctor death
Raj Thackeray on PM Modi Appeal: अर्थव्यवस्था वरून सुदृढ आणि आतून कमकुवत; राज ठाकरे यांची टीका

अभयसिंग हा गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावात होता. त्यातून आलेल्या नैराश्यातून त्याने जीवन संपविल्याचे म्हटले जाते. अभयसिंगच्या कुटुंबियांसह नातेवाईक आणि हॉस्टेलमधील इतर सहकारी निवासी डॉक्टरांचे जबाब पोलीस आता नोंदवणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news