Mumbai Firing News: गुंड आसिफ दाडीच्या मुलावर मुंबईत अज्ञाताकडून गोळीबार

या गोळीबारात त्याच्या पायाला एक गोळी लागली असून त्याच्यावर जे. जे रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
Mumbai Firing News
Mumbai Firing NewsPudhari
Published on
Updated on

मुंबई: कुख्यात डॉन दाऊद इब्राहीमच्या टोळीसाठी काम करणारा कुख्यात गुंड आसिफ मोहम्मद इक्बाल शेख ऊर्फ आसिफ दाडी याचा मुलगा समीर आसिफ मोहम्मद शेख याच्यावर मंगळवारी सायंकाळी डॉकयार्ड परिसरात अज्ञात व्यक्तीने गोळीबार केला. या गोळीबारात त्याच्या पायाला एक गोळी लागली असून त्याच्यावर जे. जे रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या गोळीबाराच्या घटनेने परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Mumbai Firing News
JJ Hospital resident doctor death: जे. जे.मध्ये 26 वर्षीय निवासी डॉक्टरने संपवलं आयुष्य

मंगळवारी सायंकाळी सव्वासहा वाजता समीर हा डॉकयार्ड रोडने जात असताना त्याच्या दिशेने एका अज्ञाताने गोळ्या झाडल्या. मात्र प्रसंगावधान दाखविल्याने समीरच्या पायाला एक गोळी लागली. रक्तबंबाळ समीरला तातडीने जे. जे रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Mumbai Firing News
MLAs Japan Tour Cancelled: मोदींच्या आवाहनानंतर 12 आमदारांचे विदेश दौरे रद्द

हा गोळीबार कुणी व का केला हे स्पष्ट झालेले नाही. गोळीबारानंतर हल्लेखोर पळून गेला. समीर हा आसिफ मोहम्मद शेखचा मुलगा असून तो संघटित टोळीतील सराईत गुंड आहे. यापूर्वी त्याच्याविरुद्ध पोलिसांनी मोकातर्गंत कारवाई केली होती. विशेष म्हणजे, त्याचा बाप आसिफ मोहम्मदवरही अशाच प्रकारे गोळीबार झाला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news