Vande Bharat Sleeper: मुंबई-बंगळूर २४ तासांचा प्रवास आता फक्त १६ तासांत; वंदे भारत स्लीपरची तारीख ठरली, कुठे-कुठे थांबणार?

भारतीय रेल्वे आता दुसरी वंदे भारत स्लीपर ट्रेन मुंबई ते बंगळूर दरम्यान सुरू करण्याच्या तयारीत आहे. या ट्रेनमुळे सध्या सुमारे २४ तासांचा असलेला प्रवास १६ तासांपेक्षा कमी वेळेत पूर्ण होईल.
Vande Bharat sleeper train
Vande Bharat sleeper trainFile Photo
Published on: 
Updated on: 

Mumbai Bangalore Vande Bharat Sleeper Train

मुंबई : या वर्षाच्या सुरुवातीला गुवाहाटी आणि हावडा दरम्यान पहिली 'वंदे भारत' स्लीपर ट्रेन सुरू केल्यानंतर, भारतीय रेल्वे आता दुसरी 'वंदे भारत' स्लीपर ट्रेन सुरू करण्यास सज्ज झाली आहे. दीर्घ विलंबानंतर, रेल्वे बोर्डाकडून मुंबई ते बंगळूर वंदे भारत स्लीपर' ट्रेनबाबतची अधिसूचना लवकरच जारी केली जाण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिन्याच्या अखेरीस ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला जाऊ शकतो.

भारतीय रेल्वेने वंदे भारत स्लीपर सेवा मुंबई CSMT ते KSR बंगळूर मार्गावर सुरू करण्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या सेवेला झालेल्या विलंबानंतर आता रेल्वे प्रशासनाकडून ती शक्य तितक्या लवकर सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहेत.

Vande Bharat sleeper train
Petrol Diesel price: पेट्रोल-डिझेल आणखी महाग होणार? जगभरात चिंता वाढली; OPEC+ने घेतला मोठा निर्णय

१६ तासांपेक्षा कमी वेळेत बंगळूर-मुंबई प्रवास, कुठे-कुठे थांबणार?

प्रस्तावित वेळापत्रकानुसार ही प्रीमियम स्लीपर ट्रेन आठवड्यातून सहा दिवस दोन्ही दिशेने धावण्याची शक्यता आहे. सध्या मुंबई आणि बंगळूर दरम्यान थेट धावणारी उद्यान एक्स्प्रेस हा प्रवास पूर्ण करण्यासाठी सरासरी २४ तास घेते. त्यामुळे वंदे भारत स्लीपरमुळे प्रवासाच्या वेळेत मोठी बचत होणार आहे. तात्पुरत्या वेळापत्रकानुसार, ट्रेन रात्री १० वाजता KSR बंगळूरहून सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी १ वाजून ५० मिनिटांनी मुंबई CSMT येथे पोहोचू शकते. परतीच्या प्रवासात मुंबईहून रात्री १०.३० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी १.५० वाजता बंगळूरला पोहोचण्याची शक्यता आहे. मात्र, हे वेळापत्रक अद्याप अंतिम झालेले नसून त्यात बदल होऊ शकतो. या ट्रेनचे संभाव्य थांबे अनंतपूर, गुंतकल, रायचूर, कलबुर्गी, सोलापूर आणि कल्याण असतील. अधिकृत उद्घाटनाची तारीख अद्याप जाहीर झालेली नसली तरी, रेल्वे विभागाला लवकरात लवकर सोयीस्कर वेळी ही सेवा सुरू करण्यास सांगण्यात आले आहे.

वंदे भारत स्लीपरमध्ये काय खास?

वंदे भारत स्लीपर ट्रेनमध्ये एकूण १६ प्रवासी डबे असतील. यामध्ये ११ एसी ३-टियर, चार एसी २-टियर आणि एक एसी फर्स्ट क्लास डबा असेल. ही ट्रेन ताशी १६० किलोमीटरपर्यंतच्या वेगाने धावण्यासाठी तयार करण्यात आली आहे. चाचणीदरम्यान तिचा वेग ताशी १८० किलोमीटरपर्यंत नेण्यात आला आहे. त्यामुळे या ट्रेनचा समावेश सेमी-हायस्पीड श्रेणीत होतो. मात्र, भारतीय रेल्वेच्या बहुतांश मार्गांवर पायाभूत सुविधा अद्याप इतक्या वेगाने ट्रेन चालवण्यासाठी सक्षम नाहीत. युरोपियन रेल्वेगाड्यांच्या डिझाइनपासून प्रेरणा घेत वंदे भारत स्लीपरच्या डब्यांमध्ये प्रवाशांच्या आरामासाठी कुशनयुक्त बर्थ देण्यात आले आहेत. वरच्या बर्थवर चढणे सोपे व्हावे, यासाठी त्याच्या डिझाइनमध्येही बदल करण्यात आला आहे.

सुरक्षेसाठी देशात विकसित करण्यात आलेली प्रणाली

प्रवाशांच्या सुरक्षेसाठी वंदे भारत स्लीपरमध्ये देशात विकसित करण्यात आलेली ‘कवच’ अँटी-कॉलिजन प्रणाली बसवण्यात आली आहे. तसेच, चेअर कार वंदे भारतप्रमाणेच या ट्रेनमध्येही ऊर्जा बचतीसाठी रीजेनरेटिव्ह ब्रेकिंग तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. डब्यांदरम्यान स्वयंचलित इंटरकनेक्टिंग दरवाजे देण्यात आले आहेत. जोडणीचे मार्ग पूर्णपणे सीलबंद असल्याने ट्रेनमधील स्वच्छ हवा आणि तापमान नियंत्रण राखण्यास मदत होते. प्रत्येक डब्यात प्रवाशांच्या सोयीसाठी वैयक्तिक रीडिंग लाइट्स, चार्जिंग पॉइंट्स आणि रिफ्रेशमेंट टेबल्स यांसारख्या सुविधा आहेत. आतील भागात जीएफआरपी पॅनेल्सचा वापर करण्यात आला आहे. ट्रेनचे दरवाजे निर्धारित स्थानकांवर आपोआप उघडतील अशा प्रकारे डिझाइन केले आहेत. या ट्रेनमध्ये 'सेंट्रलाइज्ड कोच मॉनिटरिंग सिस्टम' देखील आहे. आपत्कालीन संपर्क सुविधेमुळे प्रवाशांना गरज भासल्यास थेट चालकाशी संवाद साधता येतो.

Vande Bharat sleeper train
Ram Mandir donation theft: पैसे मोजणाऱ्या कर्मचाऱ्यांनीच उघडकीस आणली देणगीतील चोरी; आरोपपत्रातून धक्कादायक माहिती समोर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news