Mukesh Khanna Controversy: 'जन मन गण' हटवा... त्याचा क्वीन एलिझाबेथशी संबंध; शक्तिमानने मोठं बोलण्याच्या केली चूक

Mukesh Khanna Controversy
Mukesh Khanna Controversypudhari
Published on
Updated on

Mukesh Khanna Jan Gana Mana Controversy: प्रसिद्ध टीव्ही अभिनेता आणि शक्तिमान फेम मुकेश खन्ना हे आपल्या अभिनयापेक्षा वक्तव्यांनीच जास्त चर्चेत राहतात. ते आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमी सोशल मीडियावर ट्रेंड होतात. आता शक्तिमान फेम मुकेश खन्ना यांनी जन गण मन ऐवजी वंदे मातरम् हे देशाचे नवे राष्ट्रगीत करण्यात यावं अशी मागणी केली आहे. त्यानंतर याबाबत मोठी वाद सुरू झाला आहे.

Mukesh Khanna Controversy
Mukesh Khanna Samay Raina: समय रैनाला अश्लील म्हणणाऱ्या शक्तीमानला त्याचीच भासली गरज... घिरट्या मारत पोहचले त्याच्या गच्चीवर

काय म्हणाले मुकेश खन्ना?

न्यूज एजन्सी IANS शी बोलताना मुकेश खन्ना यांनी राष्ट्रगीताच्या निर्मितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. त्यांनी दावा केला की राष्ट्रगीत जन गण मन हे क्वीन एलिझाबेथला ट्रिब्युट म्हणून लिहिलं गेलं होतं.

ते म्हणाले, 'मी ही गोष्ट ३ वर्षापूर्वी देखील बोललो आहे. वंदे मातरम् ला राष्ट्रगीत करण्यात यावं. जन गण मन हे आपल्या देशाचं राष्ट्रगीत नाहीये. जन गण मन हे क्वीन एलिझाबेथ यांना ट्रिब्युट म्हणून रविंद्र टागोर यांनी त्यांच्या सन्मानार्थ लिहिले होते. आपण ते राष्ट्रगीत म्हणून स्वीकारले. भाग्य विधाता, पंजाब सिंग हे आपलं नाही तर वंदे मातरम हे आपलं आहे. लता दिदींनी ते अत्यंत सुरेख पद्धतीनं गायलं आहे.

मुकेश खन्ना पुढे म्हणाले की, माझी कल्याणजी आनंदजी यांच्याशी देखील भेट झाली होती. त्यावेळी मी सात मिनिटांचे वंदे मातरम गाणं रिकेॉर्ड केलं होतं.

Mukesh Khanna Controversy
Mukesh Khanna: रणबीरला रामाच्या रूपात पाहून भडकले शक्तिमान फेम मुकेश खन्ना, म्हणतात, मला वाटत नाही श्रीराम योद्धा म्हणून......

मुकेश खन्ना यांचा मोठा दावा

मुकेश खन्ना यांनी वंदे मातरम् चे महत्व देखील सांगितलं. ते म्हणाले की जन गण मन आपल्या देशातून हटलं पाहिजे. या चागी वंदे मातरम् आलं पाहिजे. मोदीजींनी या दिशेने काम करणे सुरू केलं आहे. आता हे शाळा आणि प्रत्येक कार्यक्रमात बंधनकारक असणार आहे. आधी वंदे मातरम् हे पूर्ण गायलं जाईल. गीतातील जो भाग पूर्वी हटवण्यात आला होता तो देखील गायला जाणार आहे. मला आनंद आहे की वंदे मातरमचे महत्व वाढत आहे.

Mukesh Khanna Controversy
Mukesh khanna: मुलींबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन अभिनेता मुकेश खन्ना वादाच्या भोवऱ्यात, महिला आयोगाकडून कारवाईची मागणी

शक्तिमान चुकला

मात्र मुकेश खन्ना यांनी याबाबत वक्तव्य करताना काही गंभीर चुका देखील केल्या. मुकेश खन्ना यांनी वंदे मातरम् हे राष्ट्रगीत झालं पाहिजे अशी मागणी करत आहेत. मात्र वंदे मातरम् हे आधीच राष्ट्रगीत झालं आहे. तसेच त्यांनी 'जन गण मन' ऐवजी 'जन मन गण' असं म्हटलं. त्याचबरोबर त्यांनी पंजाब सिंधला पंजाब सिंग म्हटलं. कधी काळी लहान मुलांना उपदेश देणारा हा शक्तिमान खुद्द चुकल्यामुळं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news