Monsoon update : उत्तर भारतात मान्सून सक्रिय; कोकण, गोवासह गुजरातसाठी 'रेड अलर्ट' जारी

देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा
Monsoon update :
Monsoon update :Pudhari
Published on
Updated on

Monsoon update : दीर्घप्रतीक्षेनंतर अखेर उत्तर भारतासह देशाच्या विविध भागांत मान्सून पूर्णपणे सक्रिय झाला आहे. बुधवारी रात्री दिल्ली आणि आसपासच्या परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे दिल्लीकरांना गेल्या काही दिवसांपासून छळणाऱ्या असह्य उकाड्या आणि उष्णतेपासून मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, हवामान विभागाने (IMD) देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला असून वेगवेगळ्या भागांसाठी 'अलर्ट' जारी केला आहे.

कोकण, गोवा आणि दक्षिण गुजरातला 'रेड अलर्ट'

एकीकडे उत्तर भारतात पाऊस स्थिरावत असताना, पुढील ४ ते ५ दिवसांत कोकण, गोवा आणि दक्षिण गुजरातमध्ये अत्यंत मुसळधार ते अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून हवामान विभागाने या दोन्ही राज्यांसाठी आणि गुजरातच्या दक्षिण भागासाठी 'रेड अलर्ट' जारी केला आहे. नागरिकांना आणि पर्यटकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Monsoon update :
Monsoon Update : अल-निनोचा अडथळा पार..! वरुणराजा सक्रिय, अरबी समुद्रातील वारे बळकट; 8 दिवसांत पाऊस महाराष्ट्र व्यापणार

उत्तर भारतात मान्सूनचा वेग वाढणार

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील २ ते ३ दिवसांत मान्सूनचा वेग आणखी वाढणार आहे. पंजाब, हरियाणा, दिल्ली-एनसीआर आणि उत्तर प्रदेशच्या उर्वरित भागांत मान्सून पूर्णपणे सक्रिय होणार असल्याने या भागातही पावसाचा जोर वाढेल.

दिल्ली-एनसीआरसाठी 'यलो अलर्ट'; तापमानात मोठी घट

उष्णतेच्या लाटेनंतर रात्री झालेल्या पावसामुळे दिल्लीतील कमाल तापमानात लक्षणीय घट नोंदवली गेली आहे. सध्या दिल्लीतील तापमान ३२°C ते ३४.८°C दरम्यान खाली आले आहे. हवामान विभागाने दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रासाठी (NCR) 'यलो अलर्ट' जारी केला आहे. आगामी काळात येथे अंशतः ढगाळ आकाश राहून मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि वादळी वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Monsoon update :
Rafale Sukhoi Assam highway | चीनच्या सीमेजवळ भारताची मोठी झेप; आसामच्या महामार्गावर उतरणार राफेल आणि सुखोई

मध्य भारत आणि ओडिशातही मुसळधार पावसाची शक्यता

फक्त पश्चिम किनारपट्टीच नव्हे, तर मध्य भारत आणि ओडिशाच्या काही भागांमध्येही मान्सून जोरदार बॅटिंग करणार आहे. या भागातही पुढील काही दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून स्थानिक प्रशासनाला सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news