नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू मोहम्मद शमी दुखापतीमुळे क्रिकेटपासून दूर आहे. शमीवर नुकतीच शस्त्रक्रिया पार पडली, त्यामुळे तो आगामी 'आयपीएल'ला मुकणार आहे. आता खुद्द शमीने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना अपडेट दिली आहे.
शमीने रुग्णालयातील त्याचे काही फोटो शेअर करत म्हटले की, सर्वांना नमस्कार… माझ्या शस्त्रक्रियेला 15 दिवस झाले आहेत आणि नुकतेच माझे टाके काढण्यात आले आहेत. आतापर्यंत सर्वकाही चांगले झाले असून, मी समाधानी आहे. माझ्या पुढील उपचारासाठी मी उत्साहित आहे.
हेही वाचा :