MUM vs VID Ranji Trophy Final Day 4 : ५३८ धावांच्‍या लक्ष्‍याचा पाठलाग करताना विदर्भाला सलग दोन धक्‍के

MUM vs VID Ranji Trophy Final Day 4 : ५३८ धावांच्‍या लक्ष्‍याचा पाठलाग करताना विदर्भाला सलग दोन धक्‍के

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर मुंबई आणि विदर्भ संघात रणजी ट्रॉफीअंतिम सामना खेळवला जात आहे. आज सामन्‍याच्‍या चौथा दिवस आहे. विजयासाठी विदर्भासमोर ५३८ धावांचे लक्ष्‍य आहे.

मुंबईतील वानखेडे स्‍टेडियमवर सुरु असलेल्‍या सामन्‍यात विदर्भाचा कर्णधार अक्षय वाडकरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबईने पहिल्या डावात 224 धावा केल्या. प्रत्युत्तरात विदर्भाचा पहिला डाव 105 धावांत आटोपला. त्यांच्या दुसऱ्या डावात मुंबईने 418 धावा केल्या आणि त्यांची एकूण आघाडी 537 धावांची झाली आणि विदर्भासमोर 538 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. प्रत्युत्तरात विदर्भाने तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत दुसऱ्या डावात एकही विकेट न गमावता 10 धावा केल्या होत्‍या.

MUM vs VID Ranji Trophy Final Day 4 : विदर्भाला सलग दोन धक्‍के

आज सामन्‍याच्‍या चौथ्‍या दिवशी सलग विदर्भाला सलग दोन धक्‍के बसले. १९ व्‍या षटकामध्‍ये विदर्भाच्‍या अथर्व तायडेला शम्‍स मुलाणीने पायचीत केले. त्‍याने ६४ चेंडूत ४ चौकार फटकावत ३२ धावा केल्‍या. यानंतर २० षटकामध्‍ये विदर्भाला दुसरा धक्‍का बसला. २८ धावांवर खेळणार्‍या शोरे याला तनुषने क्‍लीनबोल्‍ड केले. ६५ धावांवर विदर्भ संघाला दुसरा धक्‍का बसला. २५ षटकांत विदर्भाने २ गडी गमावत ७१ धावा केल्‍या.

मुंबईचा दुसरा डाव, मुशीरचे दमदार शतक

पृथ्वी शॉ 11 धावा, भूपेन लालवाणी 18 धावा, अजिंक्य रहाणे 73 धावा, श्रेयस अय्यर 95 धावा, हार्दिक तामोर 5 धावा, मुशीर खान 136 धावा, शार्दुल ठाकूर शून्य, तनुष कोटियन 13 धावा करून बाद झाले.यानंतर अखेर शा. मुलानी 50 धावा केल्या. धावांची नाबाद खेळी खेळली. तर शार्दुल ठाकूरला खातेही उघडता आले नाही. तनुष कोटियनने 13, तुषार देशपांडेने 2 धावा केल्या.

विदर्भाचा पहिला डाव १०५ धावांवर आटाेपला

शार्दुल ठाकूरने ध्रुव शौरेला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्याला खातेही उघडता आले नाही. तर धवल कुलकर्णीने अमन मोखाडे आणि करुण नायरला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. अमन आठ धावा करून बाद झाला. त्याचवेळी करुणला खातेही उघडता आले नाही. अथर्व तायडेला. धवल कुलकर्णीने त्याला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. अथर्वला 23 धावा करता आल्या.यानंतर शम्स मुलाणी यांचा कहर पाहायला मिळाला. त्याने आदित्य ठाकरे, अक्षय वाडकर आणि हर्ष दुबे यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. आदित्यला १९, अक्षयला पाच आणि हर्षला एक धाव करता आली. यानंतर तनुषने तीन गडी बाद करत विदर्भाचा डाव गुंडाळला. त्याने यश राठोड (27), यश ठाकूर (16) आणि उमेश यादव (2) यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यश राठोडने सर्वाधिक धावा केल्या. मुंबईकडून शेवटचा प्रथम श्रेणी सामना खेळणाऱ्या धवल कुलकर्णीने तीन बळी घेतले. त्याचवेळी शम्स मुलानी आणि तनुष कोटियन यांनीही प्रत्येकी तीन विकेट घेतल्या. शार्दुलला एक विकेट मिळाली.

मुंबईची पहिला डावात 224 धावांपर्यंत मजल

मुंबईची सुरुवात चांगली झाली. पृथ्वी शॉ आणि भूपेन लालवानी यांनी पहिल्या विकेटसाठी 81 धावांची भागीदारी केली. यश ठाकूरने ही भागीदारी तोडली. त्याने भूपेनला अक्षयकरवी झेलबाद केले. त्याला 37 धावा करता आल्या. यानंतर हर्ष दुबेने पृथ्वीला क्लीन बोल्ड केले. त्याला 46 धावा करता आल्या. या दोन विकेट्सनंतर विकेट्सची झुंबड उडाली. मुशीर खान सहा धावा करून बाद झाला, कर्णधार अजिंक्य रहाणे सात धावा करून, श्रेयस अय्यर सात धावा करून आणि हार्दिक तामोरे पाच धावा करून बाद झाला. शम्स मुलानी 13 धावा करून बाद झाला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news