एका योजनेमुळे 'हे' राज्य ठरलं भारतातील पहिलं संपूर्ण साक्षर

India first fully literate state | एका छोट्या राज्याने भारताच्या शिक्षण इतिहासात मोठा विक्रम रचला आहे. जाणून घ्या कसं आणि कोणत्या योजनेखाली मिळवलं हे अभूतपूर्व यश.
India first fully literate state
India first fully literate state file photo
Published on
Updated on

India first fully literate state |

मिजोरम : देशाच्या शैक्षणिक प्रवासात एक ऐतिहासिक टप्पा गाठण्यात आला आहे. मिझोराम हे ULLAs (Understanding Lifelong Learning for All in Society) उपक्रमांतर्गत भारतातील पहिले पूर्ण साक्षर राज्य बनले आहे. मिझोराम विद्यापीठात (एमझेडयू) एका कार्यक्रमात मुख्यमंत्री लालदुहोमा यांनी मंगळवारी मिझोरामला देशातील पहिले पूर्ण साक्षर राज्य म्हणून घोषित केले.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री जयंत चौधरी आणि मिझोरामचे शिक्षण मंत्री डॉ. वनलालथलाना उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री लालदुहोमा म्हणाले, आजचा दिवस आपल्या राज्याच्या प्रवासातील एक ऐतिहासिक क्षण आहे, जो येणाऱ्या पिढ्या लक्षात ठेवतील. ही कामगिरी केवळ एक आकडेवारी नाही तर आपल्या लोकांच्या सामूहिक इच्छाशक्ती, शिस्त आणि दृष्टिकोनाचे प्रतिबिंबित करणारा एक परिवर्तनात्मक टप्पा आहे. त्यांनी सांगितले की, हे यश राज्यावर प्रेम करणाऱ्या आणि समर्पणाने काम करणाऱ्या नागरिकांच्या सामूहिक कठोर परिश्रमाचे परिणाम आहे. त्यांनी विशेषतः अशा १,६९२ लोकांचा उल्लेख केला ज्यांनी पूर्वी शिक्षण घेण्याची संधी गमावली होती परंतु नंतर असाधारण चिकाटी आणि शिकण्याची इच्छा दाखवली.

India first fully literate state
India Post GDS 3 Merit List | भारतीय डाक विभागाची तिसरी यादी जाहीर; तुमचं नाव आहे का? इथे चेक करा

एका नवीन युगाची सुरुवात

मुख्यमंत्री म्हणाले, आपण हा दिवस कोणत्याही मोहिमेचा शेवट म्हणून नव्हे तर एका नवीन युगाची सुरुवात म्हणून साजरा करत आहोत. संधी, सक्षमीकरण आणि समावेशनाने परिपूर्ण अस युग येईल, असे मुख्यमंत्री लालदुहोमा म्हणाले. साक्षरता हा चळवळीचा शेवट नसला तरी, आम्ही सतत शिक्षण, डिजिटल आणि व्यावसायिक कौशल्य प्रशिक्षणाद्वारे साक्षरता टिकवून ठेवण्यासाठी आमची वचनबद्ध आहोत. ही फक्त सुरुवात आहे असे सांगून त्यांनी सर्व मिझो नागरिकांना मोठे विचार करण्याचे आणि उच्च ध्येय ठेवण्याचे आवाहन केले. चला आता आपण प्रत्येक मिझोरामला डिजिटल साक्षरता, आर्थिक साक्षरता आणि उद्योजकता कौशल्ये प्रदान करण्याचे ध्येय ठेवूया, असे आवाहन त्यांनी केले.

देशासाठी अभिमानाचा दिवस!

केंद्रीय राज्यमंत्री जयंत चौधरी यांनीही मिजोरामच्या नागरिकांचे अभिनंदन केले. ते म्हणाले, “हा दिवस फक्त मिजोरामचाच नाही, तर संपूर्ण देशासाठी अभिमानाचा क्षण आहे.” त्यांनी राज्याच्या समावेशक विकासाच्या भावनेचे कौतुक केले आणि मिझोराम कायम शिक्षण आणि कौशल्य विकासाच्या क्षेत्रात देशाचे नेतृत्व करत राहील, असा विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले की, हा दिवस केवळ मिझोरामसाठीच नाही तर संपूर्ण देशासाठी अभिमानाचा दिवस आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मुख्य सचिव खिल्ली राम मीणा यांनी केले. त्यांनी सर्वांचे स्वागत केले आणि मिझोरामच्या या ऐतिहासिक कामगिरीचा थोडक्यात अहवाल सादर केला.

मिझोराम कसं बनलं सुशिक्षित? 

केंद्र सरकारकडून चालवल्या जाणाऱ्या ULLAS योजनेंतर्गत मिझोरामला ही मान्यता देण्यात आली आहे. या उपक्रमात किमान ९५ टक्के साक्षरता दर हा मानक मानला गेला आहे. नियतकालिक कामगार दल सर्वेक्षण (PSFS 2023-2024) नुसार, मिझोरमने 98.2 टक्के साक्षरता दर गाठला आहे. हे अभूतपूर्व यश राज्य शालेय शिक्षण विभागाच्या, विशेषतः समग्र शिक्षा अभियान आणि न्यू इंडिया साक्षरता कार्यक्रम (नव भारत साक्षरता कार्यक्रम) अंतर्गत, सततच्या प्रयत्नांचे परिणाम आहे.

मिझोरम सरकारने राज्य साक्षरता अभियान प्राधिकरण अंतर्गत एक नवीन योजना सुरू केली आहे. समग्र शिक्षा मिझोरमद्वारे ही मोहीम चालवण्यात आली. त्याअंतर्गत एक गव्हर्निंग कौन्सिल आणि कार्यकारी समिती स्थापन करण्यात आली. या मोहिमेला पाठिंबा देण्यासाठी, SCERT अंतर्गत राज्य साक्षरता केंद्राची स्थापना करण्यात आली. त्यांनी मिझो भाषेत शिक्षण साहित्य विकसित केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news