India Post GDS 3rd Merit List 2025
दिल्ली : भारतीय टपाल विभागाने ग्रामीण डाक सेवक (GDS) २०२५ भरतीची तिसरी गुणवत्ता यादी जाहीर केली आहे. ही यादी indiapostgdsonline.gov.in या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध केली आहे. यावर उमेदवार राज्यानुसार यादी डाउनलोड करून आपलं नाव आहे की नाही, हे तपासू शकतात.
भारतीय टपाल विभागाने ग्रामीण डाक सेवक (GDS)/शाखा पोस्टमास्टर (BPM)/सहाय्यक शाखा पोस्टमास्टर (ABPM) ची २१४१३ पदे भरण्यासाठी ही भरती प्रक्रिया राबवली. यासाठी अर्ज प्रक्रिया १० फेब्रुवारी ते ३ मार्च दरम्यान पार पडली होती.
राज्यनिहाय गुणवत्ता यादी वेबसाइटवर उपलब्ध आहे. ज्या उमेदवारांनी निर्धारित वेळेत यशस्वीरित्या नोंदणी केली होती आणि त्यांचे नाव पहिल्या किंवा दुसऱ्या गुणवत्ता यादीत आले नव्हते ते ही यादी तपासू शकतात. इंडिया पोस्ट जीडी ३ री गुणवत्ता यादी आंध्र प्रदेश, आसाम, बिहार, छत्तीसगड, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, झारखंड, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ईशान्य, ओडिशा, पंजाब, राजस्थान, तामिळनाडू, तेलंगणा, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल या राज्यांसाठी जाहीर करण्यात आली आहे.
इंडिया पोस्ट जीडीएस भरतीमध्ये उमेदवारांची माध्यमिक शाळेतील गुण आणि त्यांनी निवडलेला पोस्टल सर्कल या आधारे अंतिम यादी तयार केली जाते. तिसऱ्या यादीतील निवड झालेल्या उमेदवारांना लवकरच कागदपत्र पडताळणीसाठी बोलावण्यात येईल.
ज्या उमेदवारांनी इंडिया पोस्ट जीडीएस भरती प्रक्रियेसाठी अर्ज केला आहे आणि ज्यांचा रोल नंबर पहिल्या किंवा दुसऱ्या मेरिट लिस्टमध्ये नाही ते तिसरी मेरिट लिस्ट डाउनलोड करून तपासू शकतात. गुणवत्ता यादी तपासण्यासाठी येथे पायऱ्या आहेत :
सर्वप्रथम इंडियन पोस्टच्या अधिकृत वेबसाइट indiapostgdsonline.gov.in ला भेट द्या.
तुम्ही ज्या राज्यासाठी अर्ज केला आहे त्यावर क्लिक करा.
वेळापत्रक-III वर क्लिक करा.
Cntrl+F दाबा आणि तुमचे नाव शोधा.
पीडीएफ डाउनलोड करा.
भविष्यातील संदर्भासाठी गुणवत्ता यादीची प्रिंटआउट घ्या.