

Mithun's counterattack on the threat of nuclear war: '140 crore people will fill the dam, then Pakistan will be swept away'
मुंबई: पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी भारताला अणुयुद्धाची धमकी दिल्याच्या वृत्तानंतर, प्रसिद्ध अभिनेते आणि भारतीय जनता पक्षाचे नेते मिथुन चक्रवर्ती यांनी एक वादग्रस्त पण तितकेच स्फोटक विधान केले आहे. "गोळी न चालवता पाकिस्तानात त्सुनामी कशी आणायची हे आम्हाला माहीत आहे," ‘आम्ही एक धरण बांधू आणि त्यात भारतातील १४० कोटी लोक मूत्रविसर्जन करतील ते भरले की त्यानंतर आम्ही ते धरण उघडू. कोणतीही गोळी चालणार नाही, पण पाकिस्तानात अशी त्सुनामी येईल की ते वाहून जातील.’ असे म्हणत असे म्हणत त्यांनी पाकिस्तानला थेट इशारा दिला आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय आणि सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली आहे.
काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी भारताला अप्रत्यक्षपणे अणुयुद्धाची धमकी दिली होती. "जर आमच्यावर युद्ध लादले गेले, तर आम्ही भारताशी लढायला तयार आहोत आणि आमची अण्वस्त्रे केवळ प्रदर्शनासाठी नाहीत," असे विधान त्यांनी केले होते. याच पार्श्वभूमीवर एका मुलाखतीत मिथुन चक्रवर्ती यांना प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी त्यांनी वरील उत्तर दिले आहे.
या धमकीवर प्रतिक्रिया देताना मिथुन चक्रवर्ती आपल्या खास शैलीत म्हणाले, "यावर मी काय बोलणार? ठीक आहे, आम्ही एक मोठे धरण बांधू आणि भारतातील १४० कोटी लोकांना त्यात लघवी करायला सांगू. त्यानंतर आम्ही ते धरण उघडू. कोणतीही गोळी चालणार नाही, पण पाकिस्तानात अशी त्सुनामी येईल की ते वाहून जातील." त्यांनी पुढे म्हटले की,
"प्रत्येक वेळी अणुबॉम्बची धमकी देण्याची गरज नाही. आमच्याकडेही अणुबॉम्ब आहेत, पण आम्ही वायफळ बडबड करत नाही. आमच्यात आणि त्यांच्यात हाच फरक आहे."
मिथुन चक्रवर्ती यांच्या या विधानानंतर सोशल मीडियावर मोठी खळबळ उडाली आहे. त्यांच्या या वक्तव्यावर अनेकांनी विविध कमेंट केल्या आहेत. अनेकांनी त्यांच्या या 'सडेतोड' उत्तराचे कौतुक केले आहे. तर दुसरीकडे, काही जणांनी त्यांच्या भाषेवर आक्षेप घेतला आहे. मिथुन चक्रवर्तींच्या या विधानामुळे भारत-पाकिस्तान संबंधांमधील तणाव पुन्हा एकदा चर्चेत आला असून, त्यांच्या या 'फिल्मी' पण तितक्याच धारदार उत्तराने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.