Asim Munir : 'आसिम मुनीरची भाषा ओसामा बिन लादेनसारखी'; पाकिस्तानला दहशतवादी देश घोषित करण्याची अमेरिकेतून मागणी

पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल आसिम मुनीर यांच्या अणुबॉम्ब हल्ल्याच्या धमकीवजा विधानावर अमेरिकेतून तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे.
Asim Munir
Asim Munirfile photo
Published on
Updated on

वॉशिंग्टन: पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल आसिम मुनीर यांच्या अणुबॉम्ब हल्ल्याच्या धमकीवजा विधानावर अमेरिकेतून तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. अमेरिकेच्या भूमीवर पाकिस्तानकडून दिल्या जाणाऱ्या धमक्या पूर्णपणे अस्वीकार्य आहेत, असे अमेरिकेचे माजी पेंटागॉन अधिकारी मायकल रुबिन यांनी म्हटले आहे.

यामुळे अनेक लोकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे की, पाकिस्तान आता एक 'जबाबदार देश' म्हणून राहण्याच्या लायकीचा आहे का, की त्याचा अंत होण्याची वेळ आली आहे? त्यांनी मुनीर यांच्या विधानाची तुलना थेट दहशतवादी ओसामा बिन लादेनशी केली. मायकल रुबिन म्हणाले, "आसिम मुनीर यांची भाषा आम्हाला ओसामा बिन लादेनच्या भाषणांची आठवण करून देते. पाकिस्तानला दिलेला 'प्रमुख गैर-नाटो सहयोगी' देशाचा दर्जा तात्काळ काढून घ्यावा आणि त्याला 'दहशतवादाला पुरस्कृत करणाऱ्या देशांच्या यादीत टाकावे."

रुबिन यांच्या मते, पाकिस्तान हा पहिला गैर-नाटो सहयोगी देश ठरेल, ज्याला 'दहशतवादाला पुरस्कृत करणारा देश' म्हणून सूचीबद्ध केले जाईल. तसेच, पाकिस्तानने आता अमेरिकेच्या सेंट्रल कमांडचे सदस्य राहू नये.

अमेरिकन जनरल्सवरही प्रश्नचिन्ह

जेव्हा आसिम मुनीर यांनी अमेरिकेच्या भूमीवरच अशी धमकी दिली, तेव्हा अमेरिकन जनरल्सनी त्यांच्यासोबतच्या बैठकीतून वॉकआऊट का केले नाही, याबद्दल रुबिन यांनी आश्चर्य व्यक्त केले. हा एक गंभीर मुद्दा असल्याचे सांगत, ज्या जनरल्सनी असे केले नाही, त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यायला हवा, असेही ते म्हणाले.

पाकिस्तानवर कठोर कारवाईची मागणी

जोपर्यंत पाकिस्तान यावर स्पष्टीकरण देत नाही आणि माफी मागत नाही, तोपर्यंत आसिम मुनीर आणि इतर कोणत्याही पाकिस्तानी अधिकाऱ्याला अमेरिकेत 'पर्सोना नॉन ग्रेटा' म्हणून घोषित करावे आणि त्यांना अमेरिकेचा व्हिसा देऊ नये, अशी मागणीही मायकल रुबिन यांनी केली आहे. या विधानांवरून हे स्पष्ट होते की, अमेरिकेत पाकिस्तानच्या अणुबॉम्बच्या धमकीला किती गांभीर्याने घेतले जात आहे. तसेच, तेथील धोरणकर्त्यांमध्ये पाकिस्तानसोबतच्या संबंधांवर पुनर्विचार करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news