

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा
देशामध्ये २०२३-२४ या वर्षात एकूण अन्नधान्य उत्पादन ३३२२.९८ लाख टन झाल्याचा अंदाज असल्याचे केंद्रीय कृषी मंत्रालयाने बुधवारी जाहीर केले. २०२२-२३ मध्ये झालेल्या ३२९६.८७ लाख टन अन्नधान्य उत्पादन झाले होते. त्यापेक्षा हे प्रमाण २६.११ लाख टन अधिक आहे. तांदूळ, गहू आणि धान्याच्या चांगल्या उत्पादनामुळे अन्नधान्य उत्पादनात विक्रमी वाढ झाली असल्याचे मंत्रालयाने सांगितले.
कृषी मंत्रालयाने सांगितले की, २०२३-२४ या वर्षात तांदळाचे उत्पादन १३७८.२५ लाख टन झाले. गेल्या वर्षीच्या १३५७.५५ लाख टन तांदूळ उत्पादनापेक्षा हे प्रमाण २०.७० लाख टन अधिक आहे. तर यंदा गव्हाचे उत्पादन ११३२.९२ लाख टन झाल्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षीच्या ११०५.५४ लाख टन गव्हाच्या उत्पादनापेक्षा हे २७.३८ लाख टन अधिक आहे. कृषी मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, यंदा महाराष्ट्रासह दक्षिणेकडील राज्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती राहिली. ऑगस्टमध्ये विशेषतः राजस्थानमध्ये दीर्घकाळ दुष्काळ राहिला. दुष्काळामुळे रब्बी हंगामावरही परिणाम झाला. याचा प्रामुख्याने डाळी, भरड धान्य, सोयाबीन आणि कापूस उत्पादनावर परिणाम झाला आहे.
एकूण अन्नधान्य – ३३२२.९८ लाख टन (विक्रमी)
तांदूळ – १३७८.२५ लाख टन (विक्रमी)
गहू – ११३२.९२ लाख टन (विक्रमी)
पौष्टिक/भरड धान्य – ५६९.३६ लाख टन
मका – ३७६.६५ लाख टन
डाळी – २४२.४६ लाख टन
तूर – ३४.१७ लाख टन
हरभरा – ११०.३९ लाख टन
तेलबिया – ३९६.६९ लाख टन
भुईमूग – १०१.८० लाख टन
सोयाबीन – १३०.६२ लाख टन
मोहरी – १३२.५९ लाख टन (विक्रमी)
ऊस – ४५३१.५८ लाख टन
कापूस – ३२५.२२ लाख गाठी (प्रति १७० किलो)