Messi event chaos : मेस्‍सीच्‍या कार्यक्रमातील गोंधळ प्रकरणी प. बंगालच्‍या क्रीडा मंत्र्यानी दिला राजीनामा

घटनेच्‍या निःपक्षपाती चौकशीसाठी पदावरुन पायउतार
Messi event chaos
कोलकाता येथील साल्‍ट लेक स्‍टेडियमवर मेस्‍सी निघून गेल्‍यानंतर संतप्त प्रेक्षकांनी तोडफोड करत गोंधळ घातला. file photo
Published on
Updated on
Summary
  • मेस्‍सीने अवघ्‍या २० मिनिटांमध्‍ये मैदान सोडल्‍याने प्रेक्षक झाले होते संतप्‍त

  • प्रेक्षकांनी मैदानात बाटल्या फेकत स्टेडियममधील आसनव्यवस्थेची केली होती मोडतोड

  • चौकशी समितीच्‍या अहवालानंतर सरकारने अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांवर केली कठोर कारवाई

Messi event chaos

कोलकाता: अर्जेंटिनाचा सर्वकालीन सर्वोत्‍कृष्‍ट फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीच्या 'जीओएटी टूर' (GOAT Tour) कार्यक्रमादरम्यान साल्ट लेक स्टेडियमवर झालेल्या गोंधळाच्या चौकशीचे आदेश सरकारने दिल्यानंतर, पश्चिम बंगालचे क्रीडा मंत्री अरूप विश्वास यांनी आज (दि.१६) आपल्या पदाचा राजीनामा दिला. ममता बॅनर्जी यांनी हा राजीनामा स्‍वीकारला आहे. दरम्‍यान, पश्‍चिम बंगाल विधानसभा निवडणुका आता काही महिन्‍यांवर आल्‍या आहेत. या निवडणुकीपूर्वी सत्ताधारी तृणमूल काँग्रेस कोणताही धोका पत्‍करण्‍याच्‍या मनस्‍थितीत नसल्‍याने अरुप यांनी राजीनामा दिल्‍याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.

घटनेच्‍या निःपक्षपाती चौकशीसाठी पदावरुन पायउतार

मेस्‍सीच्‍या कार्यक्रमात झालेल्‍या गोंधळानंतर अरुप विश्‍वास यांच्‍यावर चौफेर टीका झाली होती. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना हाताने लिहिलेल्या पत्रात विश्वास यांनी म्हटले आहे की, या घटनेची "स्वतंत्र आणि निःपक्षपाती चौकशी" सुनिश्चित करण्यासाठी ते पायउतार होत आहेत.

Messi event chaos
Lionel Messi event impact | दिल्लीत धुक्यामुळे 61 उड्डाणे रद्द; लियोनेल मेस्सीच्या कार्यक्रमावरही परिणाम

मेस्‍सीच्‍या कार्यक्रमाला गालबोट

मेस्सीचा भारत दौरा शनिवारी गोंधळात सुरू झाला. मेस्‍सी अवघ्या २० मिनिटांत तेथून निघून गेला. यानंतर १५,००० रुपयांपर्यंत तिकीट घेतलेल्या संतप्त प्रेक्षकांनी मैदानात गोंधळ घातला आणि तोडफोड केली. मेस्सीला राज्‍यातील राजकीय नेत्‍यांनीच गराडा घातला. तिकीट खरेदी केलेल्या चाहत्यांना त्यांच्या त्‍याची झलक मिळू शकली नाही, असा आरोप प्रेक्षकांनी केला. निराश झालेल्‍या प्रेक्षकांनी मैदानात बाटल्या फेकल्या आणि स्टेडियममधील आसनव्यवस्थेची मोडतोड केली.

Messi event chaos
Lionel Messi VIP handshake | मेस्सीसोबत हस्तांदोलन करण्यासाठी व्हीआयपींची 1 कोटी मोजण्याची तयारी

कार्यक्रमाच्या आयोजकाला अटक

या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक सताद्रू दत्ता यांना अटक करण्यात आली आहे. निवडणुकीपूर्वी या घटनेमुळे टीएमसी आणि सरकारला नामुष्की पत्करावी लागली आहे, आणि भाजपने या घटनेचा हवाला देत सरकारवर गैरव्यवस्थापनाबद्दल टीका केली . दरम्यान, न्यायमूर्ती (निवृत्त) असीम कुमार रॉय यांच्या अध्यक्षतेखालील चौकशी समितीने आपला प्राथमिक अहवाल सादर केल्यानंतर सरकारने अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली आहे.गैरव्यवस्थापन आणि सुरक्षा त्रुटींची कारणे स्पष्ट करण्यासाठी पोलीस महासंचालक (DGP) राजीव कुमार यांना 'कारण दाखवा' (Show-cause) नोटीस बजावण्यात आली असून, त्यांना २४ तासांत स्पष्टीकरण देण्यास सांगण्यात आले आहे. तशाच नोटिसा बिधाननगर पोलीस प्रमुख तसेच क्रीडा विभागाच्या प्रधान सचिवांनाही जारी करण्यात आल्या आहेत. तसेच, पोलीस उपायुक्त (DCP) अनिश सरकार यांना निलंबित करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news