Maruti Suzuki Car : १,९९९ EMI ऑफर! लोक बाईक सोडून थेट कार खरेदी करू लागले; मारुतीने केली रेकॉर्डब्रेक विक्री

सणासुदीच्या काळात देशातील वाहन बाजारपेठेत मोठे उत्साहाचे वातावरण आहे. यातच, २२ सप्टेंबरपासून लागू झालेल्या नवीन जीएसटी संरचनेमुळे वाहनांच्या किमतीत मोठी कपात झाली.
Maruti Suzuki Car
Maruti Suzuki Carfile photo
Published on
Updated on

Maruti Suzuki Car

नवी दिल्ली: सणासुदीच्या काळात देशातील वाहन बाजारपेठेत मोठे उत्साहाचे वातावरण आहे. यातच, २२ सप्टेंबरपासून लागू झालेल्या नवीन जीएसटी संरचनेमुळे वाहनांच्या किमतीत मोठी कपात झाली. याचा सर्वाधिक फायदा मारुती सुझुकीला झाला असून, कंपनीने विक्रीचे नवे विक्रम प्रस्थापित केले आहेत. नवरात्रीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत मारुतीने ८० हजारहून अधिक कारची विक्री केली आहे, तसेच दररोज जवळपास ८० हजार लोक नवीन कारबद्दल चौकशी करत आहेत.

Maruti Suzuki Car
Maruti Suzuki Victoris: आली रे आली! मारुती सुझुकी व्हिक्टोरिस SUV; जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

EMI फक्त १,९९९ रुपये!

मारुती सुझुकीने विक्री वाढवण्यासाठी अत्यंत आकर्षक ऑफर दिली आहे. कंपनीने कार खरेदीसाठी फक्त १,९९९ प्रति महिना इतक्या कमी रकमेपासून EMI योजना सुरू केली आहे. यामुळे अनेक दुचाकी ग्राहक आता चारचाकी वाहनांकडे वळू लागले आहेत. कंपनीच्या या 'मास्टरस्ट्रोक'मुळे जितक्या किंमतीत बाईक किंवा स्कूटर मिळते, तितक्या मासिक हप्त्यात आता कार घरी आणणे शक्य झाले आहे. मारुती सुझुकीचे वरिष्ठ कार्यकारी अधिकारी पार्थो बनर्जी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या आकर्षक EMI मुळे दुचाकी धारकांना चारचाकीमध्ये अपग्रेड करणे सोपे झाले आहे.

विक्रीत नवा विक्रम

जीएसटी लागू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी मारुतीने तब्बल २५,००० कारची डिलिव्हरी देऊन ३५ वर्षांचा विक्रम मोडला होता. आता हाच सिलसिला पुढे सुरू आहे. नवरात्री सुरू झाल्यापासून ८०,००० हून अधिक वाहनांची विक्री झाली आहे. दररोज सुमारे ८०,००० ग्राहक नवीन कारबद्दल चौकशी करत आहेत. डीलरशिपमध्ये प्रचंड गर्दी असल्यामुळे डीलर रात्री ११ ते १२ वाजेपर्यंत गाड्यांची डिलिव्हरी करत आहेत. बनर्जी यांनी सांगितले की, "आमच्या शोरूम्समध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी आहे आणि आमचे भागीदार ग्राहकांना वाहने देण्यासाठी रात्री उशिरापर्यंत काम करत आहेत."

Maruti Suzuki Car
Maruti Suzuki| इतक्या कमी किंमतीत मारुती सुझुकीने आणली दमदार कार, डिझाईनमध्ये स्विफ्ट-वॅगनआरपेक्षा भारी; सेफ्टीमध्येही अव्वल!

छोट्या कारच्या विक्रीत वाढ

कंपनीने सांगितले की छोट्या कारची मागणी कमी होण्याचे मुख्य कारण किंमत होती. बनर्जी यांनी सांगितले की, रेपो रेटमध्ये कपात झाल्यामुळे EMI आणखी स्वस्त झाले आहेत. याशिवाय, मारुतीने निवडक एंट्री-लेव्हल मॉडेल्सच्या किमतीत २४% पर्यंत कपात केली आहे, जी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत लागू राहील. या सर्व गोष्टींमुळे ग्राहकांना कार खरेदीची सुवर्णसंधी मिळाली आहे. छोट्या कार पुन्हा लोकप्रिय होत असल्या तरी एसयूव्ही सेगमेंटलाही मोठी मागणी आहे.

पुरवठा साखळीवर ताण

विक्री वाढत असली तरी, पुरवठा साखळीवर दबाव वाढत असल्याचेही समोर आले आहे. "वाढती मागणी पूर्ण करणे हे सध्या एक आव्हान आहे. सप्टेंबरच्या पहिल्या २० दिवसांत डिस्पॅच थांबवण्यात आले होते, जे २२ सप्टेंबरला पुन्हा सुरू झाले. अनेक वाहने अजूनही ट्रांझिटमध्ये आहेत आणि आम्ही ती लवकरात लवकर ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत," असे बनर्जी यांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर, अधिकाऱ्यांनी ग्राहकांना जास्त वेटिंग पीरियड टाळण्यासाठी लवकर बुकिंग करण्याचा सल्ला दिला आहे. जीएसटी कपात, दमदार EMI ऑफर आणि किमतीतील कपात या त्रिसूत्रीमुळे मारुती सुझुकी यंदा सणासुदीच्या हंगामात विक्रीचे नवे विक्रम प्रस्थापित करण्याच्या तयारीत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news