Mann Ki Baat: पंतप्रधान मोदींनी ‘मन की बात’मध्ये सांगितल्या ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी

Mann Ki Baat: पंतप्रधान मोदींनी ‘मन की बात’मध्ये सांगितल्या ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क :  देशाने 30 लाख कोटी रुपये इतके निर्यात लक्ष्य प्राप्त केले आहे. आतापर्यंतची ही सर्वाधिक वाढ आहे. एक वेळ अशी होती की, भारताची निर्यातीमधील वाटा १०० बिलिय इतका असायचा. आता हा वाटा 400 बिलियन डॅालरवर जाऊन पोहोचला आहे. भारतात बनवल्या गेलेल्या वस्तूंची मागणी वाढत आसल्याचे दिसून येत आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी 'मन की बात'च्‍या माध्‍यमातून  जनतेशी संवाद साधताना  केले.

देशाच्या कानाकोपऱ्यातून नवीन उत्पादने आता परदेशात जात आहेत

पंतप्रधान माेदी म्‍हणाले की, देशाच्या कानाकोपऱ्यातून नवीन उत्पादने परदेशात जात आहेत. आसाममधील हैलाकांडीतील चामड्याची उत्पादने, उस्मानाबादमधील हातमागाची उत्पादने, विजापूरची फळे आणि भाज्या,  चंदौलीतील काळा तांदूळ या सर्वांची निर्यात वाढत आहे. हिमाचल, उत्तराखंडमधल्या बाजरी, भरड धान्याची पहिली खेप डेन्मार्कला निर्यात करण्यात आली. आंध्र प्रदेशातील कृष्णा आणि चित्तूर जिल्ह्यांतील बंगनपल्ली आणि सुवर्णरेखा हे प्रसिद्ध आंबे दक्षिण कोरियाला निर्यात केले जात आहेत.

आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण करूया

आता छोटे छोटे दुकानदार देखील GeM Portal वर सरकारला आपले साहित्य विकू शकतात. हाच तर नवा भारत आहे. मोठी स्वप्ने बघत त्यापर्यंत पोहोचण्याचे धाडसदेखील करतो. याच धाडसाच्या विश्वासावर आपण सर्व भारतीय मिळून आत्मनिर्भर भारत हे स्वप्न पूर्ण करू, असे आवाहनही त्‍यांनी केले. मागील वर्षी GeM Portal च्या मदतीने सरकारने १ लाख कोटी रुपयांहून अधिक वस्तू खरेदी केल्या आहेत. देशाच्या कानाकोपऱ्यातून जवळ-जवळ सव्वा लाख लघू व्यापाऱ्यांना छोटे दुकानदार आपल्या वस्तू थेट विकू शकतात, असेही त्‍यांनी सांगितले.

पंतप्रधान मोदींनी बाबा शिवानंदाविषयी काय म्हणाले?

अलिकडेच पद्म पुरस्काराने सन्मानित बाबा शिवानंद आपण पाहिले आहे. 126 वर्षाच्या व्यक्तीची इच्छाशक्ती पाहता माझ्यासारखा प्रत्येकजण आश्चर्यचकीत झाला असेल. पापणी लवताच ते नंदी मुद्रामध्ये प्रणाम करायला लागले. मीसुद्धा बाबा शिवानंद यांना खाली वाकून नमस्कार केला. पंतप्रधान मोदी हे म्हणाले की मी सोशल मिडियावर कित्येक लोकांच्या कमेंट पाहील्या आहेत की, बाबा शिवानंद यांच्या वयाच्या चार पटीने कमी वयाच्या व्यक्तींपेक्षाही खूप तंदरूस्त आहेत.

आयुष उद्योगाची बाजारपेठही सातत्याने वाढत आहे.

 आयुष उद्योगाची बाजारपेठही सातत्याने वाढत आहे. सहा वर्षांपूर्वी आयुर्वेदाशी संबंधित औषधांची बाजारपेठ २२ हजार कोटींच्या आसपास होती. आज ते सुमारे एक लाख, चाळीस हजार कोटी रुपयांवर पोहोचली असल्‍याची माहितीही त्‍यांनी दिली.

जलसंधारणात जल मंदिर योजनेची मोठी भूमिका

मी अशा राज्यातून आलो आहे जिथे नेहमीच पाण्याची टंचाई असते. गुजरातमधील विहिरींना वाव म्हणतात. गुजरातसारख्या राज्यात वावने मोठी भूमिका बजावली आहे. या विहिरी किंवा वावड्यांचे संवर्धन करण्यात 'जल मंदिर योजने'चा मोठा वाटा असल्‍याचे त्‍यांनी नमूद केले.

पंतप्रधान मोदींनी वेगवेगळ्या भाषांचा उल्लेख केला

पीएम मोदी म्हणाले की, 'मन की बात'चे एक सौंदर्य हे आहे की मला तुमचे संदेश अनेक भाषांमध्ये, अनेक बोलींमध्ये मिळतात. भारताची संस्कृती, आपल्या भाषा, आपल्या बोलीभाषा, आपली जीवनपद्धती, खाद्यपदार्थांचे वेगळेपण, ही सर्व विविधता आपली मोठी शक्‍ती असल्‍याचेही पंतप्रधान माेदी यांनी सांगितले.

हेही वाचलं का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news