

UP Man Fights with Leopard Video VIral : शिकारीच्या शोधात असणार्या बिबट्याने थेट मानवी वस्ती गाठली.... त्याची नजर वीटभट्टीवर काम करणार्या कामगार पडली...त्याने थेट त्याच्यावर झडपच घातली.. अशा जीवघेण्या प्रसंगाला तरुण अत्यंत धैर्याने सामोरे गेला. त्याने बिबट्याशी झूंज दिली... अखेर या लढाई तो जिंकला आणि बिबट्याला पळवून लावण्यात यशस्वी ठरला... असा हा अंगाचा थरकाप उडविणार्या प्रसंग उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी जिल्ह्यात घडला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. उत्तर प्रदेशच माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी हा व्हिडिओ शेअर करत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
बिबट्याबरोबरच्या मानवी संघर्षाच्या घटनांमध्ये दिवसोंदिवस वाढ होत आहे. बिबट्या त्याच्या तावडीत सापडलेली शिकार सहजा सोडत नाही. असेच काहीचे लखीमपूर खेरीमधील वीटभट्टीवर घडलं. धौरहरा फॉरेस्ट रेंजमधील बबुरी येथील एका वीट भट्टीत बिबट्या शिरला. येथे त्याने कामगारावर हल्ला केला. अत्यंत बाका प्रसंगातही कामगाराने बिबट्याशी झटापट सुरु ठेवली. बिबट्याच्या तावडीतून सुटका करुन घेण्यासाठी त्याने दिलेली झूंज अंगाचा थरकाप उडविणारी ठरली. त्याचवेळी वीटभट्टीवर उभारलेले ग्रामस्थ विटा फेकताना व्हायरल व्हिडिओमध्ये दिसते. अखेर बिबट्याला झूंज देत कामगाराने त्याच्या तावडीतून सुटका करुन घेतली. मात्र यानंतरही बिबट्याही त्याच्या मागे धावला; पण नंतर सर्व लोक बिबट्याच्या मागे लागल्याने बिबट्याने धूम ठोकल्याचे व्हिडिओमध्ये दिसते.
कामगारावर हल्ला केलेल्या बिबट्याने वीटभट्टीवरुन धूम ठोकली. यानंतर त्याने एका शेतात बसला होता. या घटनेचीमाहिती वनविभागाला देण्यात आल्यानंतर सापळा लावून बिबट्याला जेरबंद करण्यात यश आले आहे. दुधवा बफर झोन क्षेत्राचे उपसंचालक सौरीश सहाय यांनी पीटीआयला सांगितले की, गावकऱ्यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना घटनेची माहिती दिली, त्यानंतर बचाव पथकाने बिबट्याला शांत केले आणि धौरहरा रेंज मुख्यालयात नेले. बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती स्थिर आहे.
बिबट्याच्या हल्ल्याचा व्हिडिओ एक्सवर शेअर करत उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी राज्य सरकारव निशाणा साधला आहे. भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) सरकारने 'जंगलांची लूट' केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटलं आहे की, धौरहरा येथील बाबूरी गावात वीटभट्टीवर बिबट्याशी लढताना जखमी झालेल्या मजुराला सर्वोत्तम उपचार दिले पाहिजेत. भाजपच्या राजवटीत जंगलांची लूट करण्यासाठी सतत अतिक्रमण केल्यामुळे वन्य प्राण्यांना वस्त्यांकडे येण्यास भाग पाडले जात आहे. 'जर जंगले वाचली तर सर्वांचे वाचतील' असा नारा दिला आणि पर्यावरण संवर्धनाची मानसिकता असलेले सरकार सत्तेत आल्यावरच जंगलांची लूट थांबेल असा टोलाही त्यांनी लगावला आहे.