Mamata Banerjee |"कालपर्यंत माझ्या पाया पडत होते, आज..." : ममता बॅनर्जी कोणावर भडकल्या? म्हणाल्या, आता मी 'खेला' करणार!

तृणमूल काँग्रेस) पक्ष आणखी मजबूत होऊन उभारी घेईल
Mamata Banerjee slams BJP o
Mamata Banerjee Pudhari
Published on
Updated on

Mamata Banerjee slams BJP

कोलकाता : पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ममता यांनी एकीकडे भाजपवर पक्ष फोडल्याचा आरोप केला आहे, तर दुसरीकडे बंगाल पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. "कालपर्यंत जे लोक माझ्या पाया पडत होते, ते आज उलट-सुलट वर्तन करत आहेत," अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. टीएमसी (तृणमूल काँग्रेस) पक्ष आणखी मजबूत होऊन उभारी घेईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

माझ्‍याविरोधात अफवा पसरवल्‍या जात आहेत

आमच्या पक्षाचे नेते कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहत नाहीत, अशा ज्या अफवा पसरवल्या जात आहेत त्या पूर्णपणे खोट्या असल्याचे त्यांनी सांगितले. इतकेच नाही तर, भाजपने बाहेरून लोक आणून अभिषेक यांच्यावर हल्ला केल्याचा दावाही त्यांनी केला. "हल्लेखोरांना जेवण पुरवले गेले आणि याचे पुरावे माझ्याकडे आहेत. वेळ आल्यावर मीसुद्धा 'खेला' (खेळ) करेन," असा इशारा ममता बॅनर्जी यांनी दिला.

Mamata Banerjee slams BJP o
Suvendu Adhikari | "५,००० तृणमूल कार्यकर्ते मारले गेले असते, पण..." : 'तृणमूल'मधून हकालपट्टी झालेल्या नेत्याचा खळबळजनक दावा

'हिटलरनेही असे केले नसेल...'

ममता बॅनर्जी म्हणाल्या की, "राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे उडाले आहेत. अगदी हिटलरनेही असे केले नसेल. सध्याची परिस्थिती इतकी वाईट आहे की तिचे वर्णन करायला शब्दही अपुरे पडत आहेत. शोषणाच्या सर्व मर्यादा ओलांडल्या गेल्याचा आरोप करत त्यांनी आपल्या पक्षाच्या आमदारांना लाच दिली जात असल्याचा दावा केला. तुम्ही आमच्या पक्षाच्या आमदारांना लाच देऊन पक्ष फोडू शकत नाही. उलट या गोष्टींमुळे आमचा पक्ष अधिक मजबूत होईल," असा विश्‍वासही त्‍यांनी व्‍यक्‍त केला.

Mamata Banerjee slams BJP o
Mamata Banerjee |काळा कोट चढवून ममता बॅनर्जी थेट पोहचल्या कोर्टात!

अभिषेक यांच्यावरील हल्ल्याला चोख प्रत्युत्तर

अभिषेक यांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, "विरोधी पक्षातील दुसऱ्या सर्वात मोठ्या पक्षाच्या खासदाराला ज्या पद्धतीने मारहाण करण्यात आली, ते अत्यंत धक्कादायक आहे." डॉक्टरांना बोलावण्यात आले होते, तरीही रुग्णालयाने उपचार करण्यास नकार दिला, हे कसले वर्तन आहे? असा सवाल त्यांनी केला. त्या म्हणाल्या, "बेल्ले व्ह्यूचे (रुग्णालय) लोक माझ्या पाया पडायचे. तुमचे बिर्ला आणि लोढा यांच्याशी जवळचे संबंध होते, तुम्ही त्यांच्यासमोर झुकायचे. आमच्या महापौरांनी प्रत्येक गोष्टीची काळजी घेतली आहे. अगदी सहा महिन्यांपूर्वीच आम्ही अपोलोचा परवाना नूतनीकरण (रिन्यू) केला आहे."

Mamata Banerjee slams BJP o
Abhishek Banerjee attack news |अभिषेक बॅनर्जींवर हल्ला करणारे निघाले TMC नेत्याचे निकटवर्तीय!

'भाजपकडून टीएमसी आमदारांना धमक्या'

भाजपकडून आमच्या आमदारांना धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप ममता यांनी केला. टीएमसी आमदारांना बैठकीला येण्यापासून रोखले जात असल्याचे त्यांनी सांगितले. बंगालच्या माजी मुख्यमंत्र्यांनी सुनावले की, "आज तुमचा चांगला काळ आहे, म्हणूनच तुम्ही असे करत आहात. माझ्या पक्षाच्या निवडून आलेल्या आमदारांना माझ्याच बैठकीला न येण्यासाठी धमकावले जात आहे." बैठकीला येण्यापूर्वी पोलिसांनी फोन करून धमकावल्याची तक्रार पक्षाच्या चार आमदारांनी केल्याचा दावा ममता यांनी केला. तसेच, अभिषेक यांच्यावरील हल्ल्याला भाजप कार्यकर्तेच जबाबदार असून, अद्याप या हल्ल्यातील दोषींना पकडण्यात आलेले नाही, बद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news