Mamata Banerjee |काळा कोट चढवून ममता बॅनर्जी थेट पोहचल्या कोर्टात!

पश्चिम बंगालमधील निवडणूकीतील पराभवानंतर पुन्हा कार्यरत, बार कॉन्सिलने माहिती घेतली मागवून
Mamata Banerjee |काळा कोट चढवून ममता बॅनर्जी थेट पोहचल्या कोर्टात!
Published on
Updated on

Mamata Banerjee नुकत्‍याच झालेल्या पश्चीम बंगाल निवडणूकीत माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्‍वाखालील तृणमूल काँगेसला हार पत्‍करावी लागली. त्‍यांनी आज एका युक्तीवादासाठी कलकत्ता उच्च न्यायालयात काळा कोट घालून हजर होत्‍या. याची दखल घेत बार कौन्सिल ऑफ इंडियाने पश्चिम बंगाल राज्य बार कौन्सिलकडे वकील म्हणून त्यांच्या नोंदणीची स्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. ममता बॅनर्जी या कायद्याच्या पदवीधर असून त्‍यांनी पूर्वी सुप्रीम कोर्टात वकीली केली आहे. दरम्यान बार कॉन्सिलने त्‍यांना पत्र लिहले आहे.

आज गुरुवारी त्‍या निवडणुकीनंतरच्या हिंसाचाराशी संबंधित जनहित याचिकेवर त्या सरन्यायाधीश सुजॉय पाल यांच्यासमोर आपला युक्तिवाद सादर करणार होत्‍या. ही याचिका टीएमसी नेते आणि वकील कल्याण बॅनर्जी यांचे पुत्र शिरसान्या बॅनर्जी यांनी दाखल केली आहे. बॅनर्जी यांनी यापूर्वी सर्वोच्च न्यायालयात एसआयआरच्या मुद्द्यावर युक्तिवाद केला आहे. दरम्यान भाजपने २०७ जागा जिंकल्या, तर टीएमसीने ८० जागा जिंकल्या. माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपने १०० जागा चोरल्याचा दावा केला होता

पश्चिम बंगाल निवडणुकीत गैरप्रकाराचे आरोप

खरं तर, पश्चिम बंगाल निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यापासून ममता बॅनर्जी सातत्याने निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचे आरोप करत आहेत. त्या भाजपपेक्षा निवडणूक आयोगाला अधिक दोष देत आहेत. टीएमसीचा दावा आहे की, निवडणूक आयोगाने विशेष मतदार यादी सुधारणा (एसआयआर) च्या  माध्यमातून लोकांना त्यांच्या मतांपासून वंचित ठेवले. त्या मतमोजणीतही गैरप्रकार झाल्याचा आरोप करत आहेत.

निवडणुकीच्या निकालानंतर हिंसाचार उसळला

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचे निकाल ४ मे रोजी जाहीर झाले. निकालानंतर अनेक ठिकाणांहून हिंसाचाराच्या घटना समोर आल्या. टीएमसी कार्यालयांवरील हल्ल्यांचे व्हिडिओदेखील सोशल मीडियावर समोर आले. पश्चिम बंगालमध्ये अराजकतेची परिस्थिती निर्माण झाली असून आपल्या कार्यकर्त्यांवर हल्ले होत असल्याचा आरोप टीएमसीने केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news