Maithili Thakur |‘तुमच्‍या उत्तरावर मी समाधानी नाही!’ : आमदार मैथिली ठाकूर यांनी काढले स्‍वत:च्‍या सरकारचे वाभाडे

आरोग्यमंत्र्यांच्‍या उत्तरावर व्‍यक्‍त केली तीव्र नाराजी, विरोधी पक्षाच्या आमदारांनी केले समर्थन
Maithili Thakur |‘तुमच्‍या उत्तरावर मी समाधानी नाही!’ : आमदार मैथिली ठाकूर यांनी काढले स्‍वत:च्‍या सरकारचे वाभाडे
Published on
Updated on

Maithili Thakur on Bihar government hospitals

पाटणा : बिहार विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान प्रसिद्ध लोकगायिका आणि भाजप आमदार मैथिली ठाकूर यांनी राज्यातील सरकारी रुग्णालयांच्या दुरावस्थेचा मुद्दा उपस्थित केला. आपल्या मतदारसंघातील रुग्णालयाची दुरवस्था मांडताना त्यांनी आपल्‍याच (संजद-भाजप) सरकारच्या लेखी उत्तराला कडाडून विरोध केला. सरकारी कागदावर सर्वकाही आलबेल असल्याचे भासवले जात असले, तरी वास्तव परिस्थिती मात्र याच्या अगदी उलट आहे," अशा शब्दांत त्यांनी सरकारला घरचा आहेर दिला.

‘रुग्णालयाची इमारत की मृत्यूचा सापळा?’

सोमवारी (दि. ९) प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान मैथिली ठाकूर यांनी आपल्या मतदारसंघातील रुग्णालयाच्या इमारतीचा प्रश्न मांडला. त्या म्हणाल्या, "इमारतीची अवस्था इतकी जर्जर झाली आहे की, कधीही मोठी दुर्घटना घडू शकते. छताचे प्लास्टर सतत पडत आहे, भिंतींना मोठ्या भेगा पडल्या आहेत आणि पावसाळ्यात वॉर्डमध्ये पाणी गळते. अशा धोकादायक स्थितीतही तिथे रुग्ण, गर्भवती महिला आणि लहान मुलांवर उपचार केले जात आहेत. हे लोकांच्या जीवाशी खेळण्यासारखेच आहे."

Maithili Thakur |‘तुमच्‍या उत्तरावर मी समाधानी नाही!’ : आमदार मैथिली ठाकूर यांनी काढले स्‍वत:च्‍या सरकारचे वाभाडे
Maithili Thakur : यादव- ब्राह्मण समाजाचं वर्चस्व असलेल्या मतदारसंघात भाजपने मैथिली ठाकूरला उमेदवारी का दिली?

आरोग्यमंत्र्यांच्‍या उत्तरावर असमाधान

बिहारमध्ये जनता दल संयुक्त आणि भाजपचे सरकार आहे. मैथिली ठाकूर या भाजपच्या आमदार असून, त्यांनी आपल्याच सरकारने दिलेल्या उत्तरावर नाराजी व्यक्त केली. त्या म्हणाल्या, “मी आरोग्यमंत्र्यांनी दिलेल्या उत्तरावर पूर्णपणे असमाधानी आहे. त्यांनी उत्तरात म्हटले आहे की, इमारत खराब नाही, फक्त दुरुस्तीची गरज आहे. मात्र, मी स्वतः पाहणी केली आहे; आरोग्यसेवा एका छोट्याशा खोलीतून चालवली जात आहे. तिथे एकही एमबीबीएस डॉक्टर नाही. पूर्वी दोन डॉक्टर होते, आता तेही नाहीत.”

Maithili Thakur |‘तुमच्‍या उत्तरावर मी समाधानी नाही!’ : आमदार मैथिली ठाकूर यांनी काढले स्‍वत:च्‍या सरकारचे वाभाडे
Maithili Thakur: बिहारमध्ये भाजपची मोठी खेळी; मैथिली ठाकूरचा पक्षप्रवेश, 25 व्या वर्षीच उमेदवारी मिळणार?

"एखाद्या मोठ्या दुर्घटनेची वाट पाहत आहात का?"

ठाकूर यांनी थेट सवाल केला की, "सरकार दरवर्षी आरोग्य बजेट वाढवत असताना रुग्णालयांची अवस्था अशी का? डॉक्टर आणि औषधांची कमतरता ही एक समस्या आहेच, पण कोसळायला आलेल्या इमारती हा त्याहून मोठा धोका आहे. नवीन इमारत बांधण्यासाठी सरकार एखाद्या मोठ्या दुर्घटनेची वाट पाहत आहे का?"

Maithili Thakur |‘तुमच्‍या उत्तरावर मी समाधानी नाही!’ : आमदार मैथिली ठाकूर यांनी काढले स्‍वत:च्‍या सरकारचे वाभाडे
Maithili Thakur : देशातील ‘सर्वात तरुण आमदार’चा मुकुट बदलला

केवळ आश्वासने नको, कृती हवी!

आरोग्यमंत्र्यांनी आपल्या उत्तरात सांगितले की, सरकार रुग्णालयांच्या स्थितीबाबत गंभीर असून अनेक ठिकाणी नवीन इमारतींना मंजुरी देण्यात आली आहे. मात्र, मैथिली ठाकूर यांनी त्यावर तत्काळ आक्षेप घेतला. "माझ्या भागातील रुग्णालय अनेक वर्षांपासून या यादीत आहे, पण प्रत्यक्षात ना दुरुस्ती झाली ना नवीन इमारत उभी राहिली. केवळ योजना आखल्या जातात, पण जमिनीवर काहीच बदलत नाही," असे त्या म्हणाल्या.

Maithili Thakur |‘तुमच्‍या उत्तरावर मी समाधानी नाही!’ : आमदार मैथिली ठाकूर यांनी काढले स्‍वत:च्‍या सरकारचे वाभाडे
Pragya Thakur | मुलगी ऐकत नसेल तर, तिचे पाय तोडा; प्रज्ञा ठाकूर यांचे वादग्रस्त वक्तव्य

विरोधी पक्षाच्या आमदारांनी केले मैथिली ठाकूर यांच्या भूमिकेचे समर्थन

या चर्चेमुळे सभागृहात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. विरोधी पक्षाच्या आमदारांनी बाके वाजवून मैथिली ठाकूर यांच्या भूमिकेचे समर्थन केले. विशेष म्हणजे, पहिल्यांदाच विधानसभेत सहभागी झालेल्या युवा आमदार मैथिली ठाकूर यांनी विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांच्या अनुपस्थितीतही आपला मुद्दा अत्यंत आक्रमकपणे लावून धरला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news