

भोपाळ; वृत्तसंस्था : आपली मुलगी जर आपले ऐकत नसेल, हिंदूंशिवाय इतरांच्या घरी जात असेल तर तिचे पाय तोडा, असे खळबळजनक वक्तव्य करून भाजपच्या माजी खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर पुन्हा चर्चेत आल्या आहे. एका धार्मिक कार्यक्रमात बोलताना त्यांनी पालकांना आवाहन करताना हे वक्तव्य केले. या वादग्रस्त विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
प्रज्ञा ठाकूर म्हणाल्या, ‘आपले मन बळकट करा. इतके बळकट करा की जर आपली मुलगी ऐकत नसेल, इतर धर्मीयांच्या घरी जात असेल, तर तर तिचे पाय मोडायला मागे-पुढे पाहू नये. जी मुलं मूल्ये पाळत नाहीत, त्यांना शिक्षा करा. ज्या मुली आई-वडिलांचं ऐकत नाहीत, घरातून पळून जाण्याच्या तयारीत असतात, त्यांच्याकडे अधिक जागरूकतेने पाहा. त्यांना घराबाहेर जाऊ देऊ नका. प्रेमाने समजवा, रागावून समजवा किंवा शिक्षा करा.
फेसबुकवर व्हायरल झाला असून, त्यावर जोरदार प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, प्रज्ञा ठाकूर यांनी आपल्या विधानाचा बचाव करताना सांगितले की, मुलांमध्ये शिस्त आणि संस्कार असायला
हवेत. हे पालकांचे कर्तव्य आहे. पालकांनी जर कठोर पावले उचलली, तर ती मुलांच्या भल्यासाठीच असते.
ही घटना भाजपसाठी अडचणीत आणणारी असून, विरोधकांनी यावरून थेट सत्ताधार्यांना लक्ष्य केले आहे. महिला सुरक्षेचा आणि अधिकारांचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.