

Madras High Court Verdict: मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई पीठाने एका घटस्फोटाच्या प्रकरणात एक मोठा निर्णय दिला आहे. उच्च न्यायालायने स्पष्ट केलं की एका हिंदू पत्नीद्वारे आपलं मंगळसूत्र काढून टाकणं पतीविरूद्ध मानसिक क्रूरता श्रेणीत मोडतं. याचबरोबर जस्टीस पी. वडमलई खंडपीठाने ३० वर्षापासून एकमेकांपासून वेगळे राहणाऱ्या जोडप्याला पतीला देण्यात आलेल्या घटस्फोटाचा निर्णय कायम ठेवला.
न्यायालायने पत्नीकडून घटस्फोटविरूद्ध याचिका दाखल करण्यात आली होती. ही याचिका न्यायालयाने रद्द केली आहे. या घटस्फोटाला खालच्या कोर्टाने २०१७ मध्ये परवानगी दिली होती. त्यानंतर २०१९ मध्ये हा निर्णय कायम ठवला होता. थाली हा दक्षिण भारतातील मंगळसूत्राचा एक प्रकार आहे. हे वैवाहिक जीवनातील एक पवित्र आभूषण आहे.
बार अँड बेंचच्या रिपोर्टनुसार या जोडप्याचे लग्न ३० ऑगस्ट १९७७ मध्ये झाले होते. हे लग्न हिंदू रिती-रिवाजानुसार झाले होते. पती हा भारतीय लष्करात कार्यरत होता. पतीने क्रूरता, सोडून देणे आणि दीर्घकाळ एकमेकांपासून वेगळे राहणे या आधारावर घटस्फोटासाठी अर्ज केला होता.
याचिकेत पतीचे म्हणणे होते की, पत्नी त्याच्यावर दुसऱ्या महिलांशी संबंध असल्याचा आरोप करत होती. तिने लष्करातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारीचे पत्रे देखील पाठवली होती. तिने आपले थाली (मंगळसूत्र) देखील काढून ठेवलं होतं. तिनं दागिने घालणे बंद केलं होतं. ख्रिश्चन धर्म स्विकारला होता. या सर्व कारणांमुळे मला घटस्फोट पाहिजे अशी याचिका पतीने कोर्टात केली होती.
पत्नीने पतीचे सर्व दावे खोडून काढत त्याच्यावर उलटे आरोप केले होते. तिने दावा केला की पतीचे इतर महिलांशी संबंध होते. पतीने एके दिवशी तिला आणि तिच्या मुलांना घरात कोंडून घालून घराला आग लावली होती. पत्नीने दावा केला की पतीने तिचा डाव्या हाताचा आंगठा कापून टाकला होता. त्यामुळं पतीवर क्रिमिनल केस दाखल झाली होती. त्यात त्याला दोषी देखील ठरवण्यात आलं होतं.
उच्च न्यायालयाने पत्नीने साक्ष देताना स्वतःच मान्य केलं की तिने मंगळसूत्र काढून ठेवलं होतं. ती सोन्याचे दागिने घालत नव्हती. मद्रास उच्च न्यायालयाने आधीच्या निकालांचा दाखला देत स्पष्ट केलं की हिंदू वैवाहिक जीवनमध्ये मंगळसूत्र अत्यंत महत्वाचे आहे. न्यायालायने जुन्या निर्णयाचा उल्लेख करत मंगळसूत्र हे वैवाहिक जीवन कायम सुरू रहावे यासाठी एक पवित्र प्रतीक आहे. मंगळसूत्र हे पतीच्या निधनानंतरच काढलं जातं. याचा आधार घेत न्यायालयाने मंगळसूत्र हटवणे ही मानसिक क्रूरता दर्शवते असे आदेशात लिहिले.
न्यायालयाने पत्नीने सैन्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना पतीच्या अनैतिक संबंधाच्या संशयावरून पत्रे लिहिण्यावर देखील टिप्पणी करत हे देखील पतीचा मानसिक छळ करण्यासारखे आहे असं म्हटलं आहे. तसेच दोघेही गेल्या ३० वर्षापासून वेगळे रहात असल्याचा मुद्दा लक्षात घेऊन न्यायालयाने खालच्या कोर्टाचा निर्णय कायम ठेवला.