adultery allegations proof | केवळ व्यभिचाराच्या संशयावरून घटस्फोट मंजूर होऊ शकत नाही : हायकोर्ट

पतीची याचिका फेटाळली, पत्नीच्या बाजूने कौटुंबिक न्‍यायालयाने दिलेला निर्णय ठेवला कायम
Patna High Court ruling on divorce and adultery
प्रातिनिधिक छायाचित्र. AI-generated image
Published on
Updated on

adultery allegations proof

पटना: "पती असो वा पत्‍नी व्यभिचाराचे केवळ मोघम आणि पुरावा नसलेले आरोप लावून घटस्फोटाची मागणी करता येणार नाही. अशा आरोपांमध्ये वेळ, ठिकाण किंवा संबंधित व्यक्तीची ओळख स्पष्ट नसेल, तर त्या आधारे घटस्फोट मंजूर केला जाऊ शकत नाही," असे निरीक्षण नोंदवत पटना उच्च न्यायालयाच्‍या न्यायमूर्ती नानी टागिया आणि न्यायमूर्ती आलोक कुमार पांडे यांच्या खंडपीठाने पतीने घटस्‍फोटासाठी दाखल केलेली याचिका फेटाळून लावली. सिवन येथील कौटुंबिक न्‍यायालयाने २०१९ मध्ये पतीची घटस्फोटाची याचिका फेटाळली होती, ज्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते.

पतीने केले होते पत्‍नीवर व्‍यभिचाराचे आरोप

'लाईव्‍ह लॉ'ने दिलेल्‍या वृत्तानुसार, पतीने दावा केला होता की, लग्नाच्या दोन वर्षांनंतर त्याच्या पत्नीच्या वागण्यात बदल झाला. ती कुटुंबाला न सांगता बाहेर जात असे. पतीने असा आरोप केला होता की, १५ ऑक्टोबर २०१२ रोजी ती सकाळी ११ वाजता घराबाहेर पडली. रात्री ९ वाजता परतली. यादरम्यान त्याने पत्नीला एका अनोळखी व्यक्तीसोबत सिनेमा हॉलमधून बाहेर पडताना पाहिले होते. तसेच, लग्नापूर्वीपासूनच तिचे संबंधित व्यक्तीशी प्रेमसंबंध असल्याचा आरोप पतीने केला होता.

Patna High Court ruling on divorce and adultery
Divorce Case Fraud | 'डिव्होर्स'साठी नात्याला 'काळीमा'... नणंदेला 'दुसरी पत्नी' सांगून मिळवला घटस्फोट!

कौटुंबिक न्‍यायालयाने फेटाळली होती पतीची याचिका

घटस्‍फोटासाठी पतीने कौटुंबिक न्‍यायालयात याचिका दाखल केली. मात्र यावेळी पत्नी हजर न राहिल्यामुळे ही प्रक्रिया एकतर्फी चालवण्यात आली होती. कौटुंबिक न्‍यायालयाने व्‍यभिचाराचे ठोस पुरावे नाहीत, असे स्‍पष्‍ट करत घटस्फोट देण्यास नकार दिला होता.या निकालाविरोधात पतीने उच्‍च न्‍यायालयात याचिका दाखल केली होती.

Patna High Court ruling on divorce and adultery
Supreme Court |तडजोडीत मान्य केलेली घटस्फोटाची संमती नंतर मागे घेता येत नाही : सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्‍वपूर्ण निर्णय

ठोस पुरावे नाहीत, साक्षीदारही नाही : उच्‍च न्‍यायालय

पाटणा उच्‍च न्‍यायालयाच्‍या न्यायमूर्ती नानी टागिया आणि न्यायमूर्ती आलोक कुमार पांडे खंडपीठाने या प्रकरणाची सखोल पडताळणी केल्यावर पतीच्या याचिकेतील त्रुटींवर बोट ठेवत स्‍पष्‍ट केले की, घटस्फोटाच्या याचिकेत पत्नीचे कोणाशी अवैध संबंध होते, त्या व्यक्तीचे नाव, वेळ किंवा ठिकाण याचा कोणताही स्पष्ट उल्लेख नव्हता.ज्या व्यक्तीसोबत पत्नीचे संबंध असल्याचा आरोप केला आहे, त्या व्यक्तीला या प्रकरणातील कायदेशीर पक्ष (Party) बनवण्यात आले नव्हते. २००३ ते २०१२ या नऊ वर्षांच्या काळात पत्नीचे वर्तन नक्की कसे "शिस्तबाह्य" होते, याचे कोणतेही विशिष्ट उदाहरण पतीने दिले नाही. तसेच, ज्या धनंजय तिवारी नावाच्या व्यक्तीचा उल्लेख साक्षीदारांनी केला, त्या गावातील एकाही व्यक्तीची साक्ष नोंदवण्यात आली नव्हती, असेही खंडपीठाने स्‍पष्‍ट केले.

Patna High Court ruling on divorce and adultery
Supreme Court maintenance ruling |'होम लोन' पोटगी कमी करण्याचे कारण ठरू शकत नाही : सुप्रीम कोर्टाचा मोठा निकाल

याचिकेबाहेरील पुराव्यांची दखल घेता येणार नाही

न्यायालयाने एक महत्त्वाचे कायदेशीर तत्व अधोरेखित केले की, 'केवळ याचिकेत (Pleadings) मांडलेल्या मुद्द्यांवरच पुरावे दिले जाऊ शकतात. एखादी गोष्ट मूळ याचिकेत नमूद केलेली नसेल, तर त्याबद्दल नंतर दिलेला पुरावा ग्राह्य धरला जाऊ शकत नाही. असे करणे समोरच्या पक्षावर अन्यायकारक ठरेल आणि कायदेशीर प्रक्रियेचा मूळ हेतूच नष्ट होईल, असे स्‍पष्‍ट करत या प्रकरणी कौटुंबिक न्‍यायालयाने र्व बाबींचा योग्य विचार करूनच घटस्फोटाची याचिका फेटाळली आहे, असे नमूद करत उच्च न्यायालयाने पतीचे अपील फेटाळून लावले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news