Madan Mitra: "प्रभू रामचंद्र मुसलमान होते, त्यांना..." TMC आमदाराच्या विधानाने खळबळ

"प्रभू रामचंद्र हे मुसलमान होते आणि त्यांना कोणतेही आडनाव नव्हते," असे वादग्रस्त विधान पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसचे आमदार मदन मित्रा यांनी केले आहे.
Madan Mitra
Madan Mitrafile photo
Published on
Updated on

Madan Mitra

कोलकाता : "प्रभू रामचंद्र हे मुसलमान होते आणि त्यांना कोणतेही आडनाव नव्हते," असे वादग्रस्त विधान पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसचे आमदार मदन मित्रा यांनी केले आहे. त्यांच्या वक्तव्यानंतर भाजपने संतप्त प्रतिक्रिया दिली असून, हा हिंदू धर्माचा थेट अपमान असल्याचे म्हटले आहे.

या प्रकरणावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अद्याप कोणतेही भाष्य केलेले नाही. दरम्यान, वाद वाढल्यानंतर मदन मित्रा यांनी स्पष्टीकरण दिले की, त्यांचा हेतू धर्माचा अपमान करण्याचा नव्हता, तर भाजपची 'हिंदू धर्माबद्दलची वरवरची समज' उघड करण्याचा होता.

Madan Mitra
Bangladesh Next Pakistan : बांगला देश दुसरा पाकिस्तान होण्याच्या मार्गावर, थरूर समितीच्या अहवालाने दिले धोक्याचे संकेत

या प्रकरणावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अद्याप कोणतेही भाष्य केलेले नाही. दरम्यान, वाद वाढल्यानंतर मदन मित्रा यांनी स्पष्टीकरण दिले की, त्यांचा हेतू धर्माचा अपमान करण्याचा नव्हता, तर भाजपची 'हिंदू धर्माबद्दलची वरवरची समज' उघड करण्याचा होता.

मदन मित्रांचे स्पष्टीकरण

हिंदू धर्माचा जाणीवपूर्वक अपमान केल्याचा भाजपचा आरोप आमदार मदन मित्रा यांनी फेटाळून लावला. भाजपच्या प्रदीप भंडारी यांनी इंटरनेटवर शेअर केलेला वादग्रस्त व्हिडिओ गेल्या वर्षीच्या एका सार्वजनिक कार्यक्रमातील भाषणाचा एडिट केलेला भाग असल्याचे मित्रा यांनी सांगितले. ते म्हणाले, "हा २०२४ मधील जुना व्हिडिओ आहे. बंगालमधील आगामी निवडणुका लक्षात घेऊन तो आता एडिट करून व्हायरल करण्यात आला आहे. तो पूर्ण व्हिडिओ नाही, जर त्यांनी पूर्ण व्हिडिओ दाखवला, तर मी असे काहीही बोललो नसल्याचे स्पष्ट होईल."

तृणमूल काँग्रेसने झटकले हात

मदन मित्रा यांनी प्रभू रामचंद्रांबाबत केलेल्या विधानाशी पक्षाचा कोणताही संबंध नसल्याचे सांगत तृणमूलने या वादापासून स्वतःला दूर केले आहे. पक्षाचे प्रवक्ते कुणाल घोष म्हणाले, "मदन मित्रा यांच्या विधानांवर भाष्य करण्यास आम्ही पात्र नाही. आम्ही 'रामायण' वाचले आहे, आम्हाला अयोध्या, लंका आणि सीतामढीबद्दल माहिती आहे."

Madan Mitra
Kolhapur circuit bench | कोल्हापूर सर्किट बेंच स्थापनेला आव्हान देणारी याचिका फेटाळली

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news