Student Protest : 'LPU'मध्ये आंदोलनाचा भडका! विद्यार्थ्यांचा मिग-२३ विमान अन् रणगाड्यावर उभे राहून निषेध; फगवाड्यात तणाव!

लैंगिक छळाच्या अफवांमुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट
LPU student protest
पंजाबमधील 'लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी' (LPU) मध्ये कथित लैंगिक छळाच्या अफवांमुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली.
Published on: 
Updated on: 

LPU student protest : पंजाबमधील 'लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी' (LPU) मध्ये कथित लैंगिक छळाच्या अफवांमुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. जाळपोळ आणि तोडफोडीचा करत विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय महामार्गही रोखून धरला. त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. दरम्यान, सोशल मीडियावर आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये विद्यार्थी मिग-२३ लढाऊ विमान आणि लष्करी रणगाड्यावर चढताना दिसत आहेत.

खिडक्यांच्या काचा फुटल्‍या आणि कुंड्यांची नासधूस

फगवाडा येथील 'लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी' (LPU) च्या आवारात एका बाहेरील व्यक्तीने विद्यार्थिनीवर कथित बलात्कार केल्याची वृत्तानंतर, आज पहाटे शेकडो विद्यार्थी तिथे जमा झाले आणि त्यानंतर हे नाट्यमय प्रकार घडले.कॅम्पसमधून समोर आलेल्या व्हिडिओमध्ये विद्यार्थ्यांचे गट निदर्शने करताना आणि न्यायाच्या मागणीसाठी घोषणाबाजी करताना दिसत आहेत. इतर दृश्यांमध्ये खिडक्यांच्या काचा फुटलेल्या आणि कुंड्यांची नासधूस झालेली दिसत आहे, तसेच विद्यापीठाच्या इमारतीच्या काही भागांत आणि विविध वस्तूंना आग लावल्याचेही दिसून येत आहे. कॅम्पसमधील काही दुकानांचीही तोडफोड करण्यात आली.

परिस्‍थिती नियंत्रणात असल्‍याचा पोलिसांचा दावा

विद्यापीठाच्या वसतिगृहात राहणाऱ्या एका विद्यार्थिनीवर २४ सप्टेंबर रोजी बलात्कार झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. या कथित हल्ल्यात प्लंबर किंवा बांधकाम कामगाराचा सहभाग असल्याचा दावा त्यांनी केला. वसतिगृह वॉर्डनला याची माहिती देऊनही कोणतीही कारवाई झाली नाही, असे सांगितले."आम्ही येथे पोहोचलो तेव्हा आम्हाला समजले की काही अफवा पसरल्या होत्या. त्या अफवांमुळेच विद्यार्थी येथे जमा झाले," असे कपूरथलाचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक गौरव तूरा यांनी सांगितले. "LPU प्रशासनाबाबत काही समस्या असलेल्या विद्यार्थ्यांशी आम्ही चर्चा केली. त्यांचे म्हणणे आम्ही ऐकून घेतले आणि त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत. परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे."

विद्यार्थिनीच्‍या तक्रारीनुसार संबंधितावर गुन्‍हा दाखल

जालंधर रेंजचे पोलीस उपमहानिरीक्षक (DIG) नवीन सिंगला यांनी नंतर सांगितले की, पोलिसांना संबंधित विद्यार्थिनीचा जबाब मिळाला असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. "आम्हाला आता माहिती आणि तिचा जबाब मिळाला आहे, तसेच गुन्हा दाखल करण्यात आला आहे," असे त्यांनी सांगितले. सिंगला यांनी सांगितले की, सुरुवातीला अज्ञात व्यक्तीविरुद्ध एफआयआर (FIR) दाखल करण्यात आला होता. कथित आरोपीची ओळख पटली नव्हती. विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, G3 वसतिगृहात राहणाऱ्या एका विद्यार्थिनीवर तीन दिवसांपूर्वी बलात्कार झाला होता.त्यानंतर ती घरी परतली होती. या प्रकरणाचा तपास केला जाईल आणि फॉरेन्सिक विश्लेषण, सीसीटीव्ही (CCTV) विश्लेषण व फोन विश्लेषण केले जाईल. विद्यार्थी नेत्यांच्या सहकार्याने तपास केला जाईल," असे ते म्हणाले.पोलिसांनी सांगितले की, एका विशेष तपास पथकाद्वारे (SIT) या आरोपांचा तपास केला जाईल. सिंगला यांनी सांगितले की, या एसआयटीचे नेतृत्व पोलीस अधीक्षक (फगवाडा) मेजर सिंग करतील.

LPU student protest
Sanjay Raut : निवडणूक आयोगाच्या विरुद्ध एकत्रितपणे आवाज उठवावा : संजय राऊतांचे विरोधी पक्षांना आवाहन

राष्ट्रीय महामार्ग रोखला

विद्यार्थ्यांनी जालंधर-फगवाडा राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला. यामुळे वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला. पोलिसांनी बाधित मार्गावरील जालंधरकडे जाणाऱ्या वाहनांना फगवाडा-जंडियाला रस्त्याकडे वळवले, तर इतर वाहतूक मुख्य रस्त्यांवरून वळवण्यात आली.परिस्थिती गंभीर होत असताना जालंधर विभागातील पोलीस दलांना पाचारण करण्यात आले होते, असे सिंगला यांनी सांगितले.

LPU student protest
Railway Accident Compensation : तिकीट हरवल्यामुळे रेल्वे नुकसान भरपाईचा दावा फेटाळू शकत नाही : सुप्रीम कोर्टाचा पुनरुच्चार

विद्यापीठाने आरोप फेटाळले

एलपीयू (LPU) च्या कुलसचिव मोनिका गुलाटी यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, "सध्या पसरवल्या जाणाऱ्या अफवांमध्ये कोणतेही तथ्य नाही."विद्यापीठाने सांगितले की, त्यांना अशी माहिती मिळाली आहे की "समाजकंटक" सोशल मीडिया आणि इतर माध्यमांतून खोट्या, निराधार आणि बनावट अफवा पसरवत आहेत. विद्यापीठाने विद्यार्थी, पालक आणि नागरिकांना आवाहन केले की त्यांनी या दाव्यांवर विश्वास ठेवू नये, तसेच ते पसरवू किंवा वाढवून सांगू नयेत; त्याऐवजी अधिकृत माध्यमांतून देण्यात आलेल्या माहितीवरच अवलंबून राहावे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news