Sanjay Raut : निवडणूक आयोगाच्या विरुद्ध एकत्रितपणे आवाज उठवावा : संजय राऊतांचे विरोधी पक्षांना आवाहन

मुंबईतील ४ ऑक्टोबरचा मोर्चा महाराष्ट्राचा संताप दाखवेल
Sanjay Raut on Election Commission Protest
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतPudhari
Published on: 
Updated on: 

Sanjay Raut on Election Commission Protest : "मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या, तर दोन निवडणूक आयुक्तांनी उघड बंड पुकारल्याचे समोर आले आहे. भारतीय जनता पक्षाला मदत होईल, लाभ होईल, अशा प्रकारचे निर्णय आणि कृती मुख्य निवडणूक आयुक्त करतात. ही लोकशाहीची हत्या आहे, स्वातंत्र्याची गळचेपी आहे. यामुळे सर्वाधिक नुकसान हे राजकीय पक्षांचं झालेलं आहे. त्यामुळेच स्वतंत्र मोर्चे किंवा आंदोलनं न करता शिवसेना व मनसे यांच्याबरोबर महाराष्ट्रातील विरोधी पक्षांनी एकत्रित आवाज उठवावा," असे आवाहन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज (दि.२७) माध्यमांशी बोलताना दिले.

१३ कोटी मतदारांची नावं बेकायदेशीरपणे वगळली

यावेळी संजय राऊत म्हणाले की, "१३ कोटी मतदारांची नावं बेकायदेशीरपणे वगळली, महाराष्ट्रात दोन कोटी नावं वगळली. दिल्ली असेल, बिहार असेल, पश्चिम बंगाल असेल, प्रत्येक राज्यामध्ये अशा पद्धतीने त्यांनी नावं वगळून भारतीय जनता पक्षाच्या संदर्भात म्हणजे त्यांना मदत होईल अशी जी भूमिका घेतली, ही अत्यंत घातक आहे."

Sanjay Raut on Election Commission Protest
Sanjay Raut : ज्ञानेश कुमार 'छोटा शकील', शार्प शूटरचा बॉस कोण समजून घ्या : संजय राऊतांनी साधला अमित शहांवर निशाणा

दीपकेंच्या मुंबईतील आंदोलनास शिवसेनेचा पाठिंबा

" मुख्‍य निवडणूक आयुक्‍तांविरोधात देशभरामध्ये संतापाचं वातावरण आहे. जंतरमंतरलाआंदोलनं सुरू झाली आहेत. पण मुख्य आंदोलनाची सुरुवात मुंबईतून होते आहे. कॉकरोच जनता पार्टीचे अभिजित दीपके यांनी मुंबईतून २ ऑक्टोबरला आंदोलनाची हाक दिली आहे. याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाली. चार ऑक्टोबरला स्वतंत्र मोर्चा आपण काढून एक महाराष्ट्राची ताकद, महाराष्ट्राचा संताप, महाराष्ट्राचा रोष दाखवावा, यावर एकमत झालं आहे. पण २ ऑक्टोबरला अभिजित दीपके कार्यक्रम आहे, त्याला सुद्धा शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा आहे. तो एक स्वतंत्र कार्यक्रम आहे, अराजकीय कार्यक्रम आहे. अभिजित दीपके यांना उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा अगदी पहिल्या दिवसापासून पाठिंबा आहे, तो यापुढे राहील," असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

Sanjay Raut on Election Commission Protest
Sanjay Raut: संजय राऊतांवर तुरुंगात विषप्रयोग झाला? राहुल गांधींमुळे मी....; राऊतांच्या दाव्याने राजकारणात खळबळ, काय घडलं?

निवडणूक आयोगाच्या विरुद्ध प्रचंड मोर्चाचे नियोजन

"कॉकरोच जनता पार्टी हा राजकीय पक्ष नाही. मुख्‍य निवडणूक आयुक्‍तांनी घेतलेल्‍या भूमिकेमुळे सर्वाधिक नुकसान विरोधी पक्षांचं झालेलं आहे, त्याच्यामुळे शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यासह महाराष्ट्रातील सर्व विरोधी पक्षांना आवाहन करण्यात येईल की, स्वतंत्र मोर्चे किंवा आंदोलनं न करता आपण एकत्रितपणे चार तारखेला सरकारच्या विरोधामध्ये आवाज उठवावा. त्याची तयारी सुरू झालेली आहे. आणि मला असं वाटतं की, भारताच्या इतिहासातला एक प्रचंड मोर्चा निवडणूक आयोगाच्या विरुद्ध चार तारखेला देशाला आणि जगाला पाहायला मिळेल," असेही संजय राऊत म्हणाले.

Sanjay Raut on Election Commission Protest
Sanjay Raut : "भोंग्याला सूर असला पाहिजे..." : देवेंद्र फडणवीसांच्या भाषणावर संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

मुख्‍य निवडणूक आयुक्‍त ज्ञानेश कुमार मोदी आणि शहांचे घरगडी

सगळ्या केंद्र सरकारच्‍या संस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्‍या घरगडी आहेत. लोकशाही, स्वातंत्र्य, संविधान यांची हत्या करून ते निर्णय देत आहेत. त्यातला मुख्य आरोपी मुख्य निवडणूक आयुक्त आहेत. आता ते सर्वच्या सर्व सारवासारव करतायत, ते तीन आयुक्त एकत्र बसलेले दाखवतायत, ते फोटो प्रसिद्ध करतायत. मग त्याला काही अर्थ नाही," असेही राऊत यावेळी म्हणाले.

ममता बॅनर्जींना आता इंडिया आघाडीचे महत्त्व पटू लागलंय

" पश्‍चिम बंगालमधल्या पराभवानंतर ममता बॅनर्जी परत एकत्र करायचा प्रयत्न करतायत. ही फार चांगली गोष्ट आहे की, ममता बॅनर्जी यांना 'इंडिया' आघाडी आता खूप गरज आणि महत्त्व पटू लागलेलं आहे. म्हणजे पहिल्या दिवसापासून आम्ही पूर्वी हे सांगत होतो, निवडणुकीत त्यांनी काँग्रेसला काही जागा दिल्या असत्या, तर काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या अडीच टक्के मतांचा फायदा नक्कीच ममता बॅनर्जी यांना झाला असता. म्हणून आता ही वेळ आहे सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे, मतभेद दूर ठेवले पाहिजेत. त्यातल्या त्यात एक जमेची बाजू अशी आहे की, निवडणूक आयोगाविरुद्धच्या आंदोलनात डाव्या पक्षांनी सुद्धा सहकार्य करावं, अशा प्रकारची भूमिका ममता बॅनर्जी यांनी घेतली. याचा अर्थ त्यांनाही त्याचं महत्त्व कळलं आहे, ऐक्याचं, एकीचं. आणि त्यांनी स्वतः डाव्या पक्षांच्या नेत्यांशी चर्चा केली आहे" असेही राऊत म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news