![प्रातिनिधिक छायाचित्र](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2024%2F04%2F7-11.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुढारी ऑनलाईन डेस्क: लोकसभा निवडणूकीचा सहावा टप्पा आज (दि.२५) पार पडत आहे. सहाव्या टप्प्यात ७ राज्ये आणि १ केंद्रशासित प्रदेशातील (जम्मू-काश्मीर) ५८ जागांवर मतदान सुरू (Lok Sabha election 2024) आहे.दरम्यान सायंकाळी 5 वाजेपर्यंत देशातील 7 राज्यांमध्ये निवडणुकीच्या 6 व्या टप्प्यात सायंकाळी 5 वाजेपर्यंत एकूण 57.7 टक्के मतदान झाले आहे.
सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदान टक्केवारी पुढीप्रमाणे : बिहार- 52.24, हरियाणा- 55.93, जम्मू काश्मीर- 51.35, दिल्ली- 53.73 टक्के, ओडिशा – 59.6 टक्के, उत्तर प्रदेश – 52.02 टक्के, पश्चिम बंगाल- 77.99 टक्के आणि झारखंडमध्ये 61.41.
दिल्लीच्या सर्व 7 जागांवर झालेल्या मतदानाव्यतिरिक्त, मतदारांनी उत्तर प्रदेशातील 14, हरियाणातील 10, बिहार आणि पश्चिम बंगालमधील प्रत्येकी 8, ओडिशातील 6, झारखंडमधील 4 जागा आणि जम्मू आणि काश्मीर मधील एका जागेसाठी मतदान झाले.
मतदानाच्या सहाव्या टप्प्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उप राष्ट्रपती जगदीप धनखर, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, भाजप नेते मनोज तिवारी, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर, सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वड्रा यांच्यासह यांच्यासह अनेक प्रमुख व्यक्तींनी मतदान प्रक्रियेत भाग घेऊन आपला मतदानाचा हक्क बजावला
हेही वाचा: