LK Advani health | लालकृष्ण अडवाणी पुन्हा रुणालयात दाखल

अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल, प्रकृती स्थिर
LK Advani Health Update
भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना मंगळवारी दिल्लीतील अपोलो रुग्णालयात पुन्हा दाखल करण्यात आले आहे.file photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी (LK Advani health) यांना मंगळवारी दिल्लीतील अपोलो रुग्णालयात पुन्हा दाखल करण्यात आले. अडवाणी यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर विशेषत: न्यूरोलॉजिस्ट डॉ. विनित सुरी यांच्या निरीक्षणाखाली उपचार सुरु आहेत.

९६ वर्षीय लालकृष्ण अडवाणी यांच्यावर याआधीही दिल्लीतील एम्स रूग्णालयात उपचार करण्यात आले होते. आता पुन्हा त्यांची तब्येत बिघडली असून त्यांना दिल्लीतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

LK Advani Health Update
लालकृष्ण अडवाणी यांची तब्येत बिघडली, एम्स रुग्णालयात दाखल

Who is LK Advani : अडवाणी यांचा ८ नोव्हेंबर १९२७ रोजी कराची (आता पाकिस्तान) येथे जन्म झाला. ते भारतीय जनता पक्षाचे (BJP) संस्थापक सदस्य आहेत. अडवाणी देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार 'भारतरत्न'ने सन्मानित आहेत. अडवाणी यांनी २००२ ते २००४ दरम्यान भारताचे ७ वे उपपंतप्रधान म्हणून काम केले. ते भाजपच्या सह-संस्थापकांपैकी एक आहेत आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) चे सदस्य आहेत.

Political career : अडवाणी यांची राजकीय कारकीर्द

हैदराबाद येथील डी. जी. नॅशनल कॉलेजमधून पदवी घेतल्यानंतर अडवाणी यांनी मुंबईच्या सरकारी लॉ कॉलेजमधून कायद्याचे शिक्षण घेतले. त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात राष्ट्रीय स्वयंसेवक संघा (RSS) सोबत केली आणि त्यानंतर ते १९५१ मध्ये भारतीय जनसंघ (BJS) या आरएसएसच्या राजकीय शाखामध्ये सामील झाले.

१९८० मध्ये अडवाणी आणि अटलबिहारी वाजपेयी यांनी भाजपची स्थापना केली. अडवाणी यांचे राजकीय दौरे अथवा रथयात्रा, भाजप पक्षाची ओळख जनमानसात रुजवण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरल्या. यामुळे भाजपला १९९८ आणि १९९९ मधील निवडणुकीत यश मिळाले. अडवाणी गांधीनगरमधून १९९८ मध्ये लोकसभेवर निवडून गेले. अडवाणी यांनी दोनदा १९९८ आणि १९९९ मध्ये केंद्रीय गृहमंत्री म्हणून काम केले. २००२ मध्ये त्यांची उपपंतप्रधान म्हणून निवड झाली. २००४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपच्या पराभवानंतर ते विरोधी पक्षनेते बनले. २००९ च्या निवडणुकीत अडवाणी हे भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार होते. पक्षाच्या पराभवानंतर त्यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला. २०१९ मधील लोकसभा निवडणुकीसाठी त्यांना उमेदवारी देण्यात आली नाही. त्यानंतर ते सक्रिय राजकारणातून दूर राहिले.

LK Advani Health Update
Lal Krishna Advani : लालकृष्ण अडवाणींना भारतरत्न; मुख्यमंत्री म्हणाले,”अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची बाब”

लालकृष्ण अडवाणी यांनी २००२ ते २००४ दरम्यान भारताचे ७ वे उपपंतप्रधान म्हणून काम केले. ते भाजपच्या सह-संस्थापकांपैकी एक आहेत आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) चे सदस्य आहेत. अडवाणी हे सर्वाधिक काळ गृहमंत्री आणि लोकसभेत सर्वाधिक काळ विरोधी पक्षनेते राहिलेले आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news