लालकृष्ण अडवाणी यांची तब्येत बिघडली, एम्स रुग्णालयात दाखल

युरोलॉजी विभागात उपचार सुरू
LK Advani Health Update
लालकृष्ण अडवाणी यांच्यावर एम्स रुग्णालयात उपचार सुरू file photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : भाजपचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती खालावली आहे. ९६ वर्षीय अडवाणी यांना बुधवारी रात्री उशिरा दिल्लीतील एम्स रूग्णालयात दाखल करण्यात आले. एम्सच्या युरोलॉजी विभागातील डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

यावर्षीच अडवाणी यांना भारतरत्न देऊन सन्मानित

८ नोव्हेंबर १९२७ रोजी पाकिस्तानातील कराची येथे एका हिंदू सिंधी कुटुंबात जन्मलेल्या अडवाणी यांना या वर्षी भारत सरकारने देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न देऊन सन्मानित केले. २०१५ मध्ये त्यांना पद्मविभूषण, भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान देण्यात आला. ते १९९८ ते २००४ दरम्यान भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) मध्ये गृहमंत्री होते. लालकृष्ण अडवाणी यांनी २००२ ते २००४ दरम्यान अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये भारताचे सातवे उपपंतप्रधानपद भूषवले होते. १० व्या आणि १४ व्या लोकसभेच्या काळात त्यांनी विरोधी पक्षनेत्याची भूमिका बजावली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news